डोंबिवली : प्रेयसी राहायला सोबत येत नाही या रागातून प्रियकराने तिच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. मानपाडा पोलिसांनी चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अवघ्या सहा तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.


डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या एका महिलेचे दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तिसोबत मैत्री होती. काही दिवस ही महिला दिनेश सोबत राहिली. मात्र दोघांमध्ये वाद सुरु झाल्याने ती महिला पुन्हा पहिल्या पतीकडे आली. महिलेला दोन मुली आहेत. एक सहा वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची. दिनेश तिवारी या महिलेकडे आला. तिने त्याच्या पुन्हा यावे असा हट्ट धरला. मात्र महिलेने दिनेशसोबत जाण्यास नकार दिला. या रागातून दिनेशने तिच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. 




महिलेला माहित नव्हते की, मुलीचे अपहरण कोणी केलं. पोलिसांकडे या घटनेविषयी कोणताही पुरावा नसताना केवळ महिलेने सांगितले की, तिचा एका मित्रसोबत वाद झाला होता. या एकाच धाग्याच्या आधारे मानपाडा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. अवघ्या सहा तासाच पोलिस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर तीन वर्षाच्या चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे.