Mumbai Weather Update : सध्या हिवाळा संपून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही प्रचंड उकाडा वाढला आहे. काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेचा सामना केल्यानंतर मागील आठवडा मुंबईकरांसाठी अल्हाददायी होता. गेल्या आठवड्यात मुंबईचा पारा काही अंशी कमी होता. पण या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद केल्यानंतर बुधवारी मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेले कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअस आहे. जे सामान्यपेक्षा 5.4 अंश जास्त होते. शहरातील दिवसाच्या तापमानात 24 तासांत पाच अंशांनी वाढ झाली आहे.
आयएमडी (IMD) कुलाबा वेधशाळेद्वारे बुधवारी नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. हे तापमान एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या 30.5 अंश सेल्सिअसपेक्षा चार अंशांनी जास्त आहे. बुधवारी IMD कुलाबानं कमाल तापमानाची नोंद सामान्यपेक्षा सुमारे 3 अंश सेल्सिअसने केली आहे.
आयएमडीनं व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटलं होतं की, कोरड्या हवामानासह कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारी IMD कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनी नोंदवलेलं किमान तापमान अनुक्रमे 23.4 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअस होतं.
गेल्या वर्षी मार्चमध्ये कमाल तापमान 28 मार्च रोजी 40.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान 28 मार्च 1956 रोजी 41.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- भरधाव एक्सप्रेस आली अन् तेवढ्यात...; पोलिसांच्या धाडसामुळं जीव द्यायला निघालेल्या युवकाचे प्राण वाचले
- फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पोलिसांच्या हाताचा चावा घेऊन फरार होण्याचा प्रयत्न अयशस्वी
- मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची सुटका होणार? मुंबई महापालिकेने मार्शलना दिली 'ही' सूचना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha