मुंबई: मुंबईतील (Mumbai News)  बोरीवलीच्या एम.एच.बी कॉलनीत जादुटोणा करुन मरणाची भीती दाखवणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केलीय. हा मांत्रिक  मध्यरात्री शेजारच्यांच्या घराबाहेर जादुटोणा करायचा. याच मांत्रिकाला पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अटक केलीय. गोकुळ भरवड असं या मांत्रिकाचं नाव आहे. कॉलनीत राहाणाऱ्या रहिवाशींनी दिलेल्या तक्रारीनंतर ही पोलीसांनी ही कारवाई केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरात राहणाऱ्या लुईस इतूर वैती (67 वर्षे) यांच्या मायकलवाडी, मोतीराम म्हात्रे रोड, दहिसर येथील ऑफिससमोर 23 आणि 24 ला मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने जादूटोणा केला. लाल मिरच्या मिठासारखा पदार्थ एक पिवळ्या रंगाचे लिंबू त्यामध्ये लोखंडी खिळा टोचलेला तसेच तेथेच ऑफिसच्या शटरला आणि भिंतीला एक लाकडी फळी टेकवून ठेवलेली आणि त्यावर "एक लडका है वो भी उपर जायेगा" असे लिहून एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची भीती घातली.  म्हणून फिर्यादी लुईस वैती यांनी बोरिवली एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


या तक्रारीनुसार पोलिसांनी भादवि कलम 3(1),3(2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर तात्काळ एम एच बी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी यांनी घटनास्थळावर पोहचले. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काही पुराव्यांचा आधार घेत आरोपीची ओळख पटवली. आरोपी हा फिर्यादी यांचा शेजारी असल्याचे समजले. मात्र आठ दिवसापूर्वीच आरोपीचे ऑपरेशन झाले असल्यामुळे त्याला लगेच अटक न करता 41अ ची नोटीस देऊन तपासाला बोलवून ताब्यात घेतले.


जादूटोण्याबाबत तक्रार करण्याचं आवाहन


परिसरात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्या घटनेमुळे  संताप व्यक्त करण्यात आला होता. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Pune Black Magic News : विद्येच्या माहेरघरात जादूटोणा! घरात भरभराट अन् पुत्रप्राप्तीसाठी महिलेची अघोरी पूजा