Mumbai Coronavirus Cases : दरदिवशी मुंबईमध्ये कोरोनाची आकडेवारी वाढताना दिसत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी (27 डिसेंबर) मुंबईमध्ये काहीसे कमी रुग्ण आढळले असले, तरी रुग्णवाढीचा दर मात्र वाढला आहे. रविवारी समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 922 होती, तर सोमवारी समोर आलेली आकडेवारी 809 आहे. पण रुग्णवाढीचा दर मात्र रविवारी 0.06 % होता, जो सोमवारी 0.07 % झाला आहे. या सर्वामुळे मुंबई पालिका प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंताही वाढली आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत 500 हून अधिकच्या संख्येने वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत नवीन 809 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ही 0.07 % वर गेला असून रुग्णदुपटीचा दरही 967 दिवसांवर गेला आहे. याशिवाय मुंबईमध्ये रविवारपर्यंत 17 इमारती सील होत्या ज्यांची संख्या आता 29 झाली आहे.
27 डिसेंबर, संध्या. 6.00 वाजता
24 तासात बाधित रुग्ण- 809
24 तासात बरे झालेले रुग्ण-335
बरे झालेले एकूण रुग्ण-748199
बरे झालेल्या रुग्णांचा दर-97%
एकूण सक्रिय रुग्ण-4765
दुप्पटीचा दर-967 दिवस
कोविड वाढीचा दर (20 डिसेंबर-26 डिसेंबर)-0.07%
- पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- राज्यात नवे निर्बंध लागू! कोरोना वाढतोय; 'हे' नियम पाळावेच लागणार अन्यथा...
- Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha