Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) महामारीमुळे वाढणारे रुग्ण आज काही प्रमाणात कमी आढळले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेतील ही रुग्णसंख्या दिलासादायक असल्याने नागरिक आणि पालिका प्रशासनाला दिला मिळाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे.  

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 7 हजार 895 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 457 झाली आहे. तर 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 92 टक्क्यांवर पोहचला आहे. 

मुंबईत नव्याने आढळलेल्या 7 हजार 895 रुग्णांपैकी 688 रुग्णत रुग्णालयात असून इतर घरुन उपचार घेत आहेत. ज्यामुळे पालिकेकडे 38 हजार 127 खाटांपैकी 5 हजार 722 खाटाच केवळ वापरल्या गेल्या आहेत. याशिवाय सद्यस्थितीला मुंबईतील 54 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत 60 हजार 371 सक्रीय रुग्ण आहेत. 

मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर.. 

 मुंबईतील रुग्णसंख्या
24 डिसेंबर683
25 डिसेंबर757
26 डिसेंबर922
27 डिसेंबर809
28 डिसेंबर1377
29 डिसेंबर2510 
30 डिसेंबर3671
1 जानेवारी6347
2 जानेवारी8063
3 जानेवारी8082
4 जानेवारी10860
5 जानेवारी15166
6 जानेवारी20181
7 जानेवारी20971
8 जानेवारी20,318
9 जानेवारी19474
10 जानेवारी13,648
11 जानेवारी11,647
12 जानेवारी16,420
13 जानेवारी13, 702
14 जानेवारी11, 317
15 जानेवारी10, 661
16 जानेवारी7, 895

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha