Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. मागील काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. मागील 24 तासांत 1 हजार 956 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. गुरुवारी ही रुग्णसंख्या 1702 असल्याने 254 रुग्णांची अधिक वाढ आज झाली आहे. ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दरही वाढत असल्याने चिंतेचं कारण आणखी वाढलं आहे. 642 दिवसांवर आता हा दर पोहोचला आहे.
राज्यात 3 हजारांहून अधिक रुग्ण
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजार 81 रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 1323 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,43,513 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.96% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे.
देशात 7 हजार 584 नवे कोरोनाबाधित
कोरोनाची संभाव्य चौथी लाट लवकरच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 7584 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये कोरोना चांगलाच फोफावताना दिसत आहे. महाराष्ट्रात दिवसागणिक मोठी रुग्णवाढ पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा बंदिस्त जागी मास्क सक्ती लागू करत नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 36 हजार 267 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर रुग्ण सकारात्मकता दर 0.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी दिवसभरात 3791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 44 हजार 92 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.