Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची संभाव्य चौथी लाट लवकरच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 7584 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये कोरोना चांगलाच फोफावताना दिसत आहे. महाराष्ट्रात दिवसागणिक मोठी रुग्णवाढ पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा बंदिस्त जागी मास्क सक्ती लागू करत नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 36 हजार 267 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर रुग्ण सकारात्मकता दर 0.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी दिवसभरात 3791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 44 हजार 92 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाचे 2 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
मुंबईकरांची चिंता वाढली
आज राज्यात 2813 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद झाली आहे
महत्त्वाच्या इतर बातम्या
- PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, विविध विकासकामांचे होणार उद्घाटन
- Petrol-Diesel Price Today 10 June 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ, देशात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?
- Sidhu Moose Wala Case : इंटरपोलकडून गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी , सिद्धू मूसवालाच्या हत्येची स्वीकारली होती जबाबदारी