मुंबई :  मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद आता पेटला आहे. कारण उद्धाटनाआधी या परिसरात भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.  त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर या सर्व वादातच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.


 मालाडमधलं हे मैदान अनेक दिवसांपासून दुरवस्थेत होतं.  2 कोटी 55 लाख रुपये खर्चून या मैदानात नव्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. नूतनीकरण केलेल्या या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देण्याचा निर्णय मंत्री अस्लम शेख यांनी घेतला होता. भाजपनं यावर आक्षेप घेतला आहे


मालाडमधील टिपु सुलतान मैदानाचे नामकरण मुळातच अनधिकृत 


राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेले मालाड मधील मैदान हे अनेक वर्षापासून दूरवस्थेत होते. 2 कोटी 55 लाख खर्चून त्या ठिकाणी आता नव्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.  काही वर्षांपूर्वी तेथील जनतेनं या मैदानावर टिपू सुलतान मैदान नावाचा लहानसा फलक लावला. मात्र,या मैदानाचे अधिकृत नामकरण केले जाण्याचा प्रस्ताव बीएमसीतही नाही तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही नाही. त्यामुळे, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारीयांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मालाडमधील मैदानाला टिपु सुलतान असे नाव देण्याबाबतची कोणतीही नोंद नाही. 


काय आहे टिपू सुलतान नाव आणि मुंबईतील वाद?



  • आज टिपू सुलतान नामकरणावरुन विरोध करणा-या भाजपनं यापूर्वी भाजप नगरसेवकांच्याच वॉर्डमधील दोन रस्त्यांना टिपु सुलतान यांचे नाव दिले आहे.  भाजपाचे सध्याचे आमदार अमित साटम यांनी एम पूर्व वॉर्ड येथील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्याबाबत 2013 मध्ये अनुमोदन दिले होते.

  • 2001 मध्ये अंधेरी पश्चिम मधील भवन्स कॉलेजमधील रस्त्याला शेर ए टिपू सुलतान मार्ग नाव  देण्याकरता  त्यावेळचे भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल हे सुचक होते. 

  • समाजवादी पक्षाच्या नगरसेवक रुखसाना सिद्दिकी यांनी जानेवारी 2021 मध्ये या बागेला टिपू सुल्तानचं नाव द्यावं अशी मागणी बाजार आणि उद्यान समितीकडे केली होती

  • गेल्या वेळी गोवंडी येथील उद्यानाला टीपू सुलतान नाव देण्याच्या प्रस्तावावरुन शिवसेनेवर टीका व्हायला लागली तेव्हा शिवसेनेनं सावध भूमीका घेतली 

  • शिवसेनेच्या नगरसेविका आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी हा नामकरणाचा प्रस्ताव अपूर्ण असल्याचा शेरा देत प्रस्ताव पुन्हा पालिका प्रशासनाकडे पाठवला.


संबंधित बातमी :