मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या महिलेने ट्विट करत 'तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते' असं म्हटलं आहे. तक्रारदार महिलेनं काही ट्वीट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं ट्वीट करत म्हटलं आहे की, एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये महिलेनं म्हटलं आहे की, "मी खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढ्या लोकांना एकत्र यावं लागतंय. मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय. तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहित बसा. जर मी चुकीची होते तर एवढे दिवसांत माझ्याविरोधात तक्रार का केली नाही? मला पाठीमागे हटावं लागलं तरी मला गर्व आहे की, मी एकटी लढले."
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार
धनंजय मुंडे प्रकरणात भाजप, मनसे नेत्यासह एका व्यक्तिचे 'त्या' महिलेवर गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्यानं देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.
रेणू शर्मा यांनी मुंडेंवर काय आरोप केलेत?
रेणू शर्मा या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय? असा सवाल रेणू यांनी केल. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.
संबंधित बातम्या
धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, भाजपची मागणी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार
"प्यार किया तो डरना क्या.? शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेची पाठराखण
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?
Dhananjay Munde : बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंची माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले...
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार