Mumbai Police : मुंबई पोलीस आणि मुंबईतील ऑर्केस्टा आणि डान्स बार मालकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप होऊन एक वर्षही उलटले नाही आणि आता पोलिसांवर रेस्टॉरंट मालकांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत. मुंबईत असे अनेक बार मलिक आहेत ज्यांचा आरोप आहे की, पोलीस त्यांच्या बारमध्ये येतात, बसतात आणि काहीवेळा सोफ्यावर झोपतात, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. काही मालकांचा असा आरोप आहे की त्यांचे बार पहाटे 1.30 च्या मुदतीपूर्वी बंद करण्यास सांगितले जाते.


ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप,


काही डान्सबार मालकांचा असा दावा आहे की, जे पोलीस त्यांच्याकडे येतात आणि त्यांना त्रास देतात, आणि म्हणतात की, त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा आदेश दिला आहे. ज्याचे ते पालन करत आहेत. मुंबईत एकूण 259 ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार आहेत. बारमालकांनी याबाबत AHAR कडे तक्रार केली आहे आणि त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, “कोविडचा हॉटेल उद्योगाच्या कमाईवर लक्षणीय परिणाम झाला आहे आणि महाराष्ट्र सरकारने सर्व निर्बंध उठवले असतानाही हा परिणाम दिसून येत आहे


स्थानिक पोलिसांकडून खूप त्रास


फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, आम्हालाही आमचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले होते, मात्र स्थानिक पोलिसांकडून आम्हाला खूप त्रास होत आहे. तक्रारीत उदाहरण देताना म्हटले आहे की, पोलिस रात्री नऊ वाजल्यापासूनच फेऱ्या मारायला लागतात. पोलिस नर्तक आणि गायकांचे फोटो काढू लागतात, त्याचा व्यवसायावर खूप वाईट परिणाम होतो आणि ग्राहकही खूप घाबरले आहेत, त्यामुळे ते जास्त वेळ न घालवता लवकर निघून जातात. दुसऱ्या एका हॉटेल व्यापाऱ्याने सांगितले की, अनेकवेळा पोलिस गणवेशात येतात आणि सोफ्यावर झोपून जातात.


वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही आदेश दिलेला नाही


एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही असा कोणताही आदेश दिलेला नाही किंवा आम्ही कोणतेही हॉटेल, रेट्रोरेंट, बार आणि ऑर्केस्ट्रा मुदतीपूर्वी बंद करण्यास सांगितले नाही. आम्ही पोलिसांना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करू नये असे सांगितले आहे. आणि जर पोलिसांनी कोणत्याही व्यावसायिकाला त्रास दिला तर ते तक्रार करू शकतात ज्याची गंभीर दखल घेतली जाईल.