Uddhav Thackeray Speech Live: प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती? उद्धव ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका

Maharashtra News LIVE Updates : आज दिवसभरात घडणाऱ्या ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2023 08:16 PM
Uddhav Thackeray Speech Live: सावरकर हे आमचे दैवत आहे...त्यांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव यांचा राहुल गांधी यांना इशारा

Uddhav Thackeray Speech Live:  सावरकर हे आमचे दैवत आहे...त्यांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव यांचा राहुल गांधी यांना इशारा 

Uddhav Thackeray Speech Live: जोपर्यंत रामशास्त्री बण्याचे न्यायाधीश आहेत तो पर्यंत लोकशाही आहे; उद्वव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

Uddhav Thackeray Speech Live:  जोपर्यंत रामशास्त्री बण्याचे न्यायाधीश आहेत तो पर्यंत लोकशाही आहे; उद्वव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

Uddhav Thackeray Speech Live: निवडणूक आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांवची सभा बघा; उद्धव ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका

Uddhav Thackeray Speech Live:  निवडणूक आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांवची सभा बघा. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती? उद्धव ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका 

Uddhav Thackeray Speech Live: दिल्लीने डोळे वटारले तर हे मिठाची गुळणी करतात; उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका

Uddhav Thackeray Speech Live:  दिल्लीने डोळे वटारले तर हे मिठाची गुळणी करतात; उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका

Uddhav Thackeray Speech Live:  शेतकऱ्यांना कर्ज मुक्त का करत नाही हे सांगण्यासाठी उत्तर सभा घ्या; मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उद्धव यांची टीका

Uddhav Thackeray Speech Live:  शेतकऱ्यांना हमीभाव नाही हमखास भाव मिळाले पाहिजे. मला उत्तर देण्यासाठी उत्तर सभा घेणार या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त का करत नाही हे सांगण्यासाठी उत्तर सभा घ्या. मुख्यमंत्र्यांना शेतकरी रक्ताने पत्र लिहितो पण पत्र वाचले नाही.

Uddhav Thackeray Speech Live: सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे हा निश्चय केला होता. जे पिकेल ते पिकेल हे धोरण राबविले - उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray Speech Live:  अस्मानी सुलतानी दोन्ही संकट होते. आपल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे हा निश्चय केला होता. जे पिकेल ते पिकेल हे धोरण राबविले - उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray Speech Live: कांद्याला भाव मिळाला नाही असे तुम्ही म्हणतात मी म्हणतो कांदा खरेदी झाली एक कांदा 50 खोक्याला विकला गेला; उद्धव यांचा टोला

Uddhav Thackeray Speech Live: कांद्याला भाव मिळाला नाही असे तुम्ही म्हणतात मी म्हणतो कांदा खरेदी झाली एक कांदा 50 खोक्याला  विकला गेला; उद्धव यांचा टोला

Uddhav Thackeray Speech Live:  कोरोनाच्या संकटात सर्वांनी सहकार्य केलं, त्यामुळे मोठ्या संकटात वाचलो. तुम्हा सर्वांचे आभार: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Speech Live:  कोरोनाच्या संकटात सर्वांनी सहकार्य केलं, त्यामुळे मोठ्या संकटात वाचलो. तुम्हा सर्वांचे आभार: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : आता फक्त जिंकेपर्यंत लढायचं, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

Uddhav Thackeray : आता फक्त जिंकेपर्यंत लढायचं, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात 

Nashik Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल, सभेसाठी मालेगावकडे रवाना 

Nashik Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले असून मालेगावकडे रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात मालेगावात पोहचणार असून सभेची संपूर्ण तयारी झाली असून सायंकाळी सात वाजता ते जनतेला संबोधित करणार आहेत. जवळपास एक लाखाहून अधिक शिवसैनिक सभेला दाखल होणार असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

जोरदार पावसातही नागपुरात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन सुरु

Nagpur : नागपूरात जोरदार पाऊस झाला या परिस्थितीत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पावसात भिजत सत्याग्रह आंदोलनात बसून राहिले. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला होता. यातच आता जोरदार पाऊस झाला आणि पावसातही आंदोलन तसेच बसून राहत राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है चे नारे दिले....

माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत येवला शहरात सायकल रॅली..

Nashik : महाराष्ट्र शासन स्वच्छता विभागाच्या वतीने येवल्यात माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत असून येवला नगरपरिषद व जय भवानी सामाजिक सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया फिट येवला असा संदेश देत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..या सायकल रॅलीची सुरुवात विंचूर चौफुली येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झाली..निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी तसेच इंधन बचतीचा संदेश देने हा रॅलीचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले..

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी उत्तर महाराष्ट्रातूनच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मालेगावात दाखल

Nashik : नाशिकच्या मालेगावमध्ये आज सायंकाळी उद्धव ठाकरेंची विराट अशी सभा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातूनच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी मालेगावात दाखल होतील असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहर भगवेमय झाला असून, शहरभर भगवे झेंडे, होर्डींग लावले गेले आहेत. सभेच्या मैदानापासूनच अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात 'जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा' अशा आशयाचे भावनिक आवाहन करणारे होर्डींगही बघायला मिळतायत. 

Congress:  राजघाटवरील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाला परवानगी नाकारली

Congress:  राजघाटवरील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.  दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस सत्याग्रह आंदोलन करण्यावर ठाम आहे. 

Nanar : 'नाणार येथील जागेचा रिफायनरीसाठी विचार व्हावा' , रिफायनरी समर्थकांचं विनोद तावडेंना निवेदन

Nanar : 2019 मध्ये राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी रद्द करण्यात आलेली आहे. दरम्यान नाणार येथील जागेचा रिफायनरीसाठी विचार व्हावा अशी मागणी करणारं निवेदन राजापूर तालुक्यातील विल्हे दशक्रोशी रिफायनरी समर्थक संघटनेनं विनोद तावडे यांना दिलंय.. विनोद तावडे काल सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आलंय..  तसंच नाणार येथील जागेबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेत समन्वय साधावा असा उल्लेख देखील या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. 

गुजरातमधून अंमली पदार्थचा लाखोंचा आलेला साठा जप्त , कोनगाव पोलिसांची कारवाई

Crime News : गुजरात राज्यातून एका टेम्पोमधून लाखोंचा अंमली पदार्थचा साठा विक्रीसाठी भिवंडी तालुक्यात घेऊन येणाऱ्या चार तस्करांना कोनगाव पोलिसांच्या पथकाने कोनतरी भागात सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. फईम मोहम्मदअली करेल (वय ४२, रा. करेल हाऊस, कोनतरी कोनगांव ता. भिवंडी)  निहाल अकिल शेख (वय २२, रा. कोनतरी कोनगांव)  फैजान आयाज मोमीन (वय २१ रा. कोनतरी कोनगांव) आणि टॅम्पोचा चालक, अजय रामलखन यादव (वय २७ रा. गुजरात ) असे बेड्या ठोकलेल्या तस्करांची नावे आहेत. 

आज ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी करणार शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे यांची मालेगांवमध्ये सभा होत असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि इतर शिवसैनिक करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यां निवासस्थानी 11 वाजण्याच्या सुमारास प्रवेश होणार आहे.  एकीकडे उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आणि दुसरीकडे ठाकरे गटाला शिंदे गटाचा सुरुंग

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : राज्यात आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) जाहीर सभा होणार आहे. तर, भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत. दरम्यान, मालेगवाच्या आजच्या सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. पाहुयात आज दिवसभरात  कुठे काय होणार.

काँग्रेसचं राज्यात आंदोलन

राहुर गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. आज काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. 

राजघाटावर प्रियांका गांधी या एक दिवसाचा सत्याग्रह करणार आहेत.

मुंबई:  राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात आज मुंबई काँग्रेसचा केंद्र सरकार विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात माजी खासदार मिलींद देवरा, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मधू चव्हाण यांच्यासह अन्य नेते सहभागी होणार आहेत.

नागपूर:  नागपूरच्या व्हरायटी चौकात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन होणार आहे. याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होण्याची शक्यता आहे. 

मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा 

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) जाहीर सभा होणार आहे. मालेगवाच्या आजच्या सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा

भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत.

संचार कंपनीचे वनवेबचे 36 उपग्रह अंतराळात सोडले

श्रीहरिकोटा इथून आज इस्त्रो आज एलव्हीएम 3 च्या माध्यमातून ब्रिटनच्या संचार कंपनीचे वनवेबचे 36 उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.