मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट अखेर झाली. शिवसेना-भाजपमधील तणाव दूर करण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून करण्यात आला.


मात्र अमित शाह यांच्या ‘मातोश्री’वारीचा आगामी विधानपरिषद निवडणुकीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

विधानपरिषदेच्या 4 जागेवर विशेषतः मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरमध्ये शिवसेना -  भाजपामध्ये थेट लढत होणार आहे.

कोकण पदवीधरची जागा भाजपची असून या ठिकाणी भाजपविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. तर मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेची असून भाजप शिवसेनेविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

आज ( 7 जून ) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, भाजप आज मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, 25 जूनला मतदान तर 28 जूनला मतमोजणी आहे.

तेव्हा अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पुढील 4 दिवसांत काय घडामोडी घडतात, विधानपरिषद निवडणूकमध्ये सेना -भाजप हे एकमेकांविरोधात लढणार की युती करणार हे   बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेषतः पालघरच्या सभेत बुधवारच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका जाहीर करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता पालघरमधील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार.तलासरी कवाडा येथे श्रीनिवास वनगा यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून, भेटीगाठी घेतील.  यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय सल्ला देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार

निरंजन डावखरे – भाजप

नजिब मुल्ला – राष्ट्रवादी काँग्रेस

संजय मोरे – शिवसेना

मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार

विलास पोतनीस- शिवसेना

अमित महेता - भाजप

राजेंद्र कोरडे – शेकाप (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)

राजू बंडगर - नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष पुरस्कृत

जालिंदर सरोदे – शिक्षक भारती

दीपक पवार - अपक्ष

मुंबई शिक्षक मतदारसंघ उमेदवार

कपिल पाटील – शिक्षक भारती (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)

अनिल देशमुख - भाजप

शिवाजी शेंडगे - शिवसेना

नाशिक शिक्षक मतदारसंघ

संदीप बेडसे - महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)

शिवसेना – किशोर दराडे (नुकतेच विधानपरिषद निवडणूक जिंकलेले नरेंद्र दराडेंचे बंधू)

भाजप –अनिकेत पाटील ( माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव)

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार

नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे

मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील

मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत

कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे

संबंधित बातम्या 

शिवसेनेची मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी विलास पोतनीसांना  

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा  

मुंबईकर पदवीधरांनो, हे जाणून घ्या....