कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर व संदीप सुर्वे यांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या प्रत्येक परिवाराला 50 लाखांची मदत व सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केलं आहे.
कोरोना विशेष कक्ष व नोडल अधिकारी
कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले.
दिलासादायक! आज कोरोना बाधितांची वाढ निम्म्याने घटली; दिवसभरात 440 नवीन रुग्णांची नोंद
वाधवान प्रकरण
वाधवान प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना गृहमंत्री म्हणाले की, आज 26 एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता सातारा पोलीस अधीक्षकांनी धिरज व कपिल वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले. तसेच त्यांचे कुटुंबातील इतर लोकांना होम क्वॉरंटाइन केले आहे. कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते, त्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सौनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल रीतसर माझ्याकडे येईल आणि पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य तो निर्णय होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे. तसेच हा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कसलेही राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
Beed Police | एक महिन्याच्या बाळाला लांबूनच पाहण्याची वेळ, कर्तव्य निभावणाऱ्या पोलिस बाबाची कहाणी | स्पेशल रिपोर्ट