मुंबई : कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांचा आकडा आजही चढताच आहे. दिलासादायक म्हणजे ही वाढ कालच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. आज राज्यात कोरोनाबाधीत 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8068 झाली आहे. आज 112 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1188 रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 19 लोकांचा कोरोनामुळे बळी गेलाय, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 16 हजार 345 नमुन्यांपैकी 1 लाख 7 हजार 519 णांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 8068 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 36 हजार 926 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 9116 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


..तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र


आज राज्यात 19 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 342 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 19 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 7 रुग्ण आहेत. तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर दोन रुग्ण 40 वर्षाखालील आहे. या 19 मृत्यूंपैकी 4 रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती मिळालेली नाही.


राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: 5407 (204)
ठाणे : 738 (14)
पालघर : 141 (4)
रायगड : 57 (1)
नाशिक : 131 (12)
अहमदनगर : 36 (2)
धुळे : 25 (3)
जळगाव : 19 (4)
नंदूरबार : 11 (1)
पुणे : 1052 (76)
सोलापूर : 47 (5)
सातारा : 29 (2)
कोल्हापूर : 10
सांगली : 27 (1)
सिंधुदुर्ग : 1
रत्नागिरी : 8 (1)
औरंगाबाद : 50 (5)
जालना : 2
हिंगोली : 8
परभणी : 1
लातूर : 9 (1)
उस्मानाबाद : 3
बीड : 1
नांदेड : 1
अकोला : 29 (1)
अमरावती : 20 (1)
यवतमाळ : 48
बुलढाणा : 21 (1)
वाशिम : 1
नागपूर : 107 (1)
वर्धा : ०
भंडारा : ०
गोंदिया : 1
चंद्रपूर : 2
गडचिरोली : ०
एकूण : 8068 (342 )


( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा/मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 604 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 8603 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 33.72 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.


Uddhav Thackeray | मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे