मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग आता आटोक्यात येताना पहायला मिळत आहे. दैनदिन कोरोना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे. असे असले तरी पुणे आणि मुंबईत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात सक्रीय रुग्णसंख्या आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात अद्याप कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान, राज्यात आज 2,149 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 15 हजार 316 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. 


राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8 हजार 079 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर त्याखालोखाल मुंबईत 6 हजार 255 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहे. राज्यात सर्वाधिक दैनदिन रुग्णसंख्येची नोंद होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 3 हजार 567 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.


मुंबईत गेल्या 24 तासात 488 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 546 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,26,040 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1120 दिवसांवर गेला आहे.


Mumbai Local : आता 18 वर्षांच्या आतील तरुणांना रेल्वेचा पास मिळणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

पुन्हा एकदा वाढला देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावतोय. गेल्या 24 तासांत 18 हजार 987 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी देशात 15 हजार 823 रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 226 रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल नोंद करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या तुलनेत आजचा आकडा हा 16 टक्क्यांनी अधिक आहे.


आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 19 हजार 808 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 6 हजार 586 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 33 लाख 62 हजार 709 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 51 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.