मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय, अशी सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली. 


मी पुन्हा येणार म्हणणारे आता म्हणतायेत मी गेलोच नाही. नाही गेलो तर मग बसा तिथेच. मला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये? असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 


उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :



  • हर्षवर्धन पाटलांसारखे लोक भाजपाचे ब्रॅन्ड ॲम्बॅसॅडर करुन टाकायला हवे. पहले मुझे नींद नही आती थी, दरवाजे पर टिक टिक हुई तो जग जाता था, फिर मैं भाजपा मे गया| अब मैं कुंभकर्ण की तरह सोता हुँ

  • अंगावर आलेल्यांना शिंगावर घेऊ. समोरुन वार करा. ईडी, सीबीआयच्या माध्यमातुन नको. जर मला आवाहन द्यायचे असेल तर शिवसैनिकांकरवी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून देईन, मुख्यमंत्री म्हणून नाही.

  • ज्यांना आजही मुख्यमंत्री असल्यासारख वाटतंय त्यांनी जर वचन पाळलं असतं तर कदाचित तेही मुख्यमंत्री झाले असते. परंतु त्यांच्या नशीबात नव्हतं.

  • मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन. हे क्षेत्र माझं नाही, शब्द पाळण्यासाही आलो आहे. पण पाय रोवुन उभा आहे.

  • हिंदुत्व म्हणजे काय? मोहनजी मी तुमच्यावर टीका करतोय असं समजु नका. जर तुम्ही आम्ही जे सांगत आहोत ते जमलेली माणसच ऐकत नसतील तर कशाला ही मेळाव्याची सोंग? आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व!

  • घराबाहेर पडल्यावर देश हा माझा धर्म. जर या धर्माआड कोणी आल तर कडवट देशाभिमानी म्हणून आम्ही उभे राहु.

  • सर्वांचे पुर्वज एक होते, आहेत. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधकांचे पूर्वज, आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचे पूर्वज, लखीमपूरला मारलेल्या शेतकर्‍यांचे पूर्वज काय परग्रहावरुन आलेले होते का? 

  • लोकशाहीत सर्वात मोठ शस्त्र म्हणजे मत. त्याच्या आधारे तुम्ही रंकाचा राव आणि रावाचा रंक करु शकता. सामान्य जनता सर्वात शक्तीमान आहे.

  • सत्तेच व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे. सर्व काही माझ्या अंमलाखाली असावं हे देखील अंमली पदार्थाचे व्यसन!

  • मी आजही सांगतो, हिंमत असेल तर सरकार पाडुन दाखवा!

  • छापा काटा खेळ असतो तसा 'छापा' टाकुन 'काटा' काढण्याचा प्रकार सुरू आहे. ही थेरं फार काळ चालत नाहीत.

  • हर हर महादेव म्हणजे काय हे परत एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखविण्याची वेळ येऊ नये परंतु आलीच तर दाखवावे लागेल.

  • शिवसेनेवर टीका करायाला तोंडात बोंडख घालुन बसले आहेत ते जर 1992 च्या दंगलीत शिवसेना नसती तर आज दिसले असते का?

  • हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदुंपासुन धोक्यात आहे.