Maharashtra Vidhan sabha Speaker Election : उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु होत आहे. 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान 9 मार्च रोजी होणार विधानसभा अध्यक्षपदाची (Vidhan sabha Speaker) निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची विनंती महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.  


3 ते 25 मार्च असा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी


महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा 22 दिवस होणार आहे. 3 ते 25 मार्च असा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. नंतर प्रलंबित बिल आणि मागण्या यावर पाच दिवस चर्चा होणार आहे.   हे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे.  


वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण वाढले होते. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी केला गेला होता. 


महाविकास आघाडी सरकार आपला  तिसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. कोरोनामुळं याआधीचं पावसाळी असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज कमी दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे.


ज्याप्रमाणे लोकसभेचं कामकाज चालतं त्यानुसार इथलंही कामकाज चालावं अशी भूमिका विरोधकांची आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. त्यामुळं हे अधिवेशन पूर्ण वेळ चालेल अशी अपेक्षा आहे. अधिवेशनात नवाब मलिकांचा राजीनामा, 12 आमदारांची वापसी, भ्रष्टाचारावरुन आरोप-प्रत्यारोप यासह विविध मुद्द्यांवरुन रान पेटणार असल्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Budget Session : 3 ते 25 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha