Maharashtra Budget Session  : उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra Budget Session) सुरुवात होतेय. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर रंगल्याचं चित्र आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना अजित पवारांना टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही. अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही. पण आता कनेक्शन कापले जात आहेत. यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 


दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू


मनी लॉंड्रिंग प्रकरणी (Money laundering) नवाब मलिकांना (Nawab Malik) अटक झालीच पाहिजे,  दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुंबईच्या खून्याशी व्यवहार खपवून घेणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. 


...तर आम्हाला विचार करावा लागे


देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर बोलताना दाऊदला सहकार्य केले तरी ठाकरे सरकार पाठिशीच आहे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असून महत्वांच्या  मुद्दयावर चर्चा झाली नाही तर आम्हाला विचार करावा लागेल असा ठाकरे सरकारला गर्भित इशारा फडणवीसांनी केला आहे. आज अधिवेशनाच्या पूर्व संध्येला बैठक झाली, देशाच्या इतिहासात जे घडले नाही ते बघायला मिळत आहे. दाऊदशी व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक याना वाचण्यासाठी अख्खं सरकार उभ राहिलं आहे. राज्य घटनेचा अवमान हे सरकार करत आहे.


मुंबईच्या खुन्याशी व्यवहार खपवून घेणार नाही


मुंबईच्या खुन्याशी व्यवहार खपवून घेणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात ही चर्चा झाली पाहिजे, ही सरकारी पक्षाची भूमिका राहिली पाहिजे असे फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून ठाकरे सरकारची ओळख निर्माण झालीय, असे फडणवीस म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Budget Session : 3 ते 25 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha