Maha Vikas Aghadi Morcha Today Live Updates : महाविकास आघाडीच्या महामोर्चाची सांगता; महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Mahavikas Aghadi Morcha Live Updates : आज सकाळी साडेदहा वाजता महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
कोश्यारींना राज्यपाल मानत नाही, महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा निशाणा
Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला (Maha Vikas Aghadi) सुरुवात झाली आहे. या मोर्चाला मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा म्हणजे आंदोलनाची पहिली ठिणगी आहे. यातून वणवा पेटल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. आजचा मोर्चा हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा आहे. या मोर्चात सगळ्यांनी सामील होणं गरजेचं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील सामील होणं गरजेचं होत असेही राऊत म्हणाले.
ड्रोनद्वारे पोलिसांची मोर्चावर नजर... उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी
Mahamorcha of MVA : मोहम्मद अली रोडवर महामोर्चावर पुष्पवृष्टी केली जात आहे.
राज्यातील विविध प्रश्नांवर आज महाविकास आघाडीकडून काढण्यात येत असलेल्या महामोर्चात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत. तसेच या मोर्चात आदित्य ठाकरेही सहभागी होत आहेत. या मोर्चासंबंधित एक महत्त्वाची बैठक सुरु असून त्यानंतर सर्व प्रमुख नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत.
मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा... राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल
डाव्या संघटनांनी देखील महाविकास आघाडीच्या महामोर्चाला पाठिंबा दिलाय. मुंबईमध्ये ठाणेसह सोलापुरातून देखील डाव्या संघटनांचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
महामोर्चाच्या ठिकाणी शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे उपस्थित...
Aditya Thackeray : महाराष्ट्रावर प्रेम करणारा जनसागर सज्ज : आदित्य ठाकरे
Mahavikas Aghadhi Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत (Mumbai) महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत
मुंबई महाविकासगडीचा मोर्चा बरेच कार्यकते आले आहेत. मात्र मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेक गायक, कवी, संगीतकारही आले आहेत. सगळे आपापल्या परीने महापुरुषांविरोधी आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करत आहेत.
भिवंडी : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन होत असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत .तसेच भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान , सीमावाद , रोजगार सह शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच विविध मागण्या घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत हल्लाबोल आंदोलन केला जात आहे . या आंदोलनासाठी भिवंडीतून देखील महाविकास आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईसाठी रवाना झाले आहेत बहुतांश कार्यकर्ते हे रेल्वेने मुंबईत दाखल होणार आहेत तर हजारोचे संख्येने कार्यकर्ते हे आपापल्या वाहनाने मुंबईत आंदोलनासाठी दाखल होणार आहेत
महापुरुषांच्या अपमान करणाऱ्यांविरोधात आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारा विरोधात आज महाविकास आघाडीचा महामोर्चा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त भायखळा येथील रिचर्डसन कृदास मिल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर पोलीस गस्त घालून आहेत. दुर्बिणीमार्फत पोलीस मोर्चावर लक्ष ठेवून आहेत
भाजप नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्यामुळे आज महाविकास आघाडीचा मोर्चा होत आहे. खास करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात सातत्याने राज्यपालांकडून होणारी वादग्रस्त विधानं यामुळे राज्यपालांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे यासाठी हा मोर्चा होत असतानाच माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी मूर्ती भेट दिली आहे
विलेपार्ले येथून शिवसैनिक रेल्वेने महामोर्चासाठी निघाले आहेत. यावेळी तिकीट काउंटर परिसरात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महाविकासघडीतर्फे आज मुंबईत महामोर्चा आहे. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था केली आहे. मुंबईकरांनी जेजे उड्डाणपुलाचा वापर टाळून ईस्टर्न फ्रीवे आणि साथ रस्ता परिसराचा वापर करावा, असं मुंबई वाहतूक पोलिस अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील यांनी सांगितलं आहे.
महाविकास आघाडीचा हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. सरकारमध्ये कोणी महाराष्ट्र प्रेमी उरले असतील तर त्यांनी आमच्यात सामील व्हा त्यांचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सभास्थळी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा... महामोर्चासाठी मविआची जोरदार तयारी
महामोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना प्लेकार्ड्स आणि राष्ट्रवादीचे गमछे देण्यात येत आहेत. ज्यात महापुरुषांचा अपमान, बेरोजगारी आणि सीमावादावर ठळकपणे विधानं लिहित भाष्य केलंय. राष्ट्रवादीकडून 10 हजार प्लेकार्ड्स तयार केले गेले आहेत.
Mahavikas Aghadi Morcha : गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य तसेच महाराष्ट्र राज्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आज महाविकास आघाडीतर्फे मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला महाविकास आघाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी कल्याण ,डोंबिवली , उल्हासनगर, बदलापूर, ठाणे परिसरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेत. राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूरहून ट्रेनने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Updates) बदल करण्यात आले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे.
दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकडे जाण्यासाठी या मार्गांचा वापर करा
> महर्षी कर्वे रोड/मरीन ड्राइव्ह- ऑपेरा हाउस- लॅमिंग्टन रोड मुंबई सेंट्रल- सात रास्ता- चिंचपोकळी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग
> महर्षी कर्वे रोड/मरीन ड्राइव्ह- नाना चौक- ताडदेव सर्कल- मुंबई सेंट्रल- सात रास्ता- चिंचपोकळी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग
> सीएसएमटी स्टेशनवरून पायधुनी, भायखळा आणि नागपाडाकडे जाणाऱ्या वाहनांनी BMC रोड- मेट्रो जंक्शन- लोकमान्य टिळक मार्ग चकालाकडून डावीकडे वळण घेत जे. जे. जंक्शन- दोन टाकी- नागपाडा जंक्शन- खडा पारसी जंक्शनपासून पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
आज राज्यभरातून मविआ कार्यकर्ते मुंबईत दाखल... मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा... मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या परवानगीच्या मुद्यावरुन देखील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं मात्र, अखेर या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवस मोर्चाला परवानगीची प्रतीक्षा होती. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी देण्यात आली आहे. भायखळा येथील पोलीस ठाण्यातून ही परवानगी देण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत, मोर्चाला परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला गेला होता. परवानगी मिळाली नाही तरी आमचा मोर्चा होणारच असा पवित्रा देखील राजकीय नेत्यांनी घेतला होता.
महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
Mumbai Traffic Update: मुंबईत (Mumbai) आज महाविकास आघाडीच्यावतीने प्रचंड मोर्चा (Mahavikas Aaghadi Morcha) काढण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या मोर्चाची सुरुवात होणार असून बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ (Times Of India Building) मोर्चा थांबणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Updates) बदल करण्यात आले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरुन थोड्याच वेळात महामोर्चासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते रवाना होणार... जिल्हाभरातून 5 हजार कार्यकर्ते मुंबईकडे निघणार...
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
Maha vikas Aghadi Morcha Today Live Updates : मुंबईत आज महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
'या' मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रपेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
वाहतूक व्यवस्थेत बदल, 'या' मार्गांचा करा वापर
मुंबईत (Mumbai) आज महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा (Mahavikas Aaghadi Morcha) काढण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या मोर्चाची सुरुवात होणार असून बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ (Times Of India Building) मोर्चा थांबणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Updates) बदल करण्यात आले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे.
'हा' मार्ग वाहतुकीसाठी बंद
- मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
- भायखळ्याहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुढील मार्गाचा वापर करावा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग- खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दो टाकी- जे.जे. जंक्शन मोहम्मद अली रोड
- नागपाडा जंक्शन- मुंबई सेंट्रल-नाना चौक-एन. एस. पुरंदरे रोड
भाजपचे माफी मांगो आंदोलन
आज एकीकडे मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघत असताना दुसरीकडं भाजपच्या वतीनं माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधातमुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपकडून हे माफी मांगो आंदोलन केलं जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -