मुंबई : प्रेयसीची किरकोळ कारणावरुन गळा चिरून हत्या केल्याची घटना मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिसांनी तरुणाला जागीच पकडून अटक केली.

तरुणाने चाकू हल्ला केला असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई विद्यापीठ रस्त्यावर झालेल्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

तरुणाने तरुणीला मोबाईल क्रमांक मागितला, मात्र तरुणीने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्याने तरुणाने चाकूने हल्ला केला, असं बोललं जात आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाची चौकशी पोलीस करत आहेत.