भिवंडी : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करत सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांची सुरु आहे. परंतु या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंटेनरमधून 70 कामगारांना कोंबून भिवंडीतून उत्तर प्रदेशमध्ये नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


भिवंडी शहरातील अंजुर फाटा परिसरात अत्यावश्यक सेवा असे फलक लावलेल्या कंटेनरमधून 70 कामगारांना कोंबून भिवंडीतून उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जात असताना नारपोली पोलिसांनी पकडले. तसेच या प्रत्येक कामगारांकडून कंटेनर चालकाने उत्तर प्रदेशात सोडण्यासाठी साडेतीन ते चार हजार रुपये घेतले असल्याचे माहिती मिळाली आहे


लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक घरी परतणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थलांतराची कार्यवाही


Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; चार मे पासून अंमलबजावणी


उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कंटेनर, ट्रकमधून लपूनछपून परराज्यातील मजूर जात असताना त्यांना पकडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्या आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंटेनरमधून देखील माणसांची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या नारपोली पोलिसांनी या कंटेनरसह 70 कामगारांना ताब्यात घेतले आहे. तसेच हा कंटेनरही पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान कामगारांना त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचवण्याचा विचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


देशभरात अडकलेल्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा
लॉकडाऊनमुळे देशभरात अनेक ठिकाणी लोक अडकलेले आहेत. त्यामध्ये मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु आणि पर्यटकांचा समावेश आहे. या सर्वांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, गृह मंत्रालयाने ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना घरी परतण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. अडकलेले म. विद्यार्थी, यात्रेकरु आणि अन्य यांच्या आंतरराज्यीय प्रवासाची परवानगीची अंमलबजावणी 4 मे पासून होणार आहे नव्या गाईडलाइन्सनुसार सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नोडल अधिकारी नियुक्त करुन अकडलेल्या व्यक्तींना परत पाठवण्यासाठी तसेच मूळ ठिकाणी परत आणण्यासाठी एक एसओपीची नियुक्ती करावी लागणार आहे.


Anil Deshmukh | लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना परतण्यासाठी काय नियम आहेत? गृहमंत्र्यांची माहिती