मुंबई : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती असून त्यातच रविवार आहे, त्यामुळे आज लोकल प्रवासाच्या विचारात असललेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 14 एप्रिल रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे आज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी आण देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे मार्ग



  • ठाणे – कल्याण अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

  • ब्लॉक कालावधीत ठाणे – कल्याणदरम्यानची अप आणि धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. 

  • सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन सेवा वेळापत्रकापेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील/निघतील. 

  • ठाणे – कल्याण अप आणि धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबतील. तर, ठाकुर्ली, कोपर येथे लोकल थांबा नाही.

  • लोकल वेळापत्रकाच्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

  • ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.53 वाजता सुटेल. 

  • ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.05 वाजता सुटणार आहे.


हार्बर मार्ग



  • कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक

  • ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. 

  • पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.

  • ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल. 
    ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.44 वाजता सुटेल. 

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10.05 वाजता पनवेल येथून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 3.45 वाजता पनवेल येथून सुटणार आहे.


पश्चिम रेल्वे



  • बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

  • ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल  धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

  • काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

  • बोरिवली आणि अंधेरी येथून निघणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगाव येथे थांबतील.