मुंबई : राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडे उमेदवार नाहीत का? शिवसेनेवर उमेदवार आयात करण्याची वेळ का आली आहे? शिवसैनिकांमध्ये नाराजीची कुजबुज सुरु झाली आहे? असे अनेक सवाल जवाब आता शिवसैनिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण आधी प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर आणि आता शरद पोंक्षे यांना शिवसेना पुढे करत आहे. त्यामुळे शिवसेनेत नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


एक राज्यसभा खासदार आणि एक भावी विधानपरिषद आमदार त्यामुळे कट्टर शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीमध्ये शिवसैनिकांना न्याय मिळेल हे चित्र आत धुसर दिसू लागलंय. शिवसेनेत कलाकार, साहित्यिक, समाजसेवकांची मोठी संख्या आहे. पण नेहमीप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांना प्रामुख्याने प्राधान्य देण्याचा पांयडा पडला असल्यामुळे सैनिक नाराज असल्याची कुजबुज सध्या सुरु झाली आहे.


उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव?


गेल्या वर्षा दीड वर्षातील चित्र पुढीप्रमाणे


1. प्रियांका चतुर्वेद काँग्रेसीमधून शिवसेनेत आल्या आणि थेट राज्यसभेवर संधी


2. शंकरराव गडाख. पवार गटाचे, अपक्ष आमदार थेट कॅबिनेट मंत्री.


3. राजेद्र यड्राव्हकर, पवार गटाचे, अपक्ष आमदार थेट राज्यमंत्री


4. बच्चू कडू, अपक्ष आमदार थेट राज्यमंत्री


5. अब्दुल सत्तार, काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश थेट राज्यमंत्री


6. सचिन अहिर, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश उपनेतेपदी वर्णी. तसेच आदित्य ठाकरेंसोबत वावर


7. काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आलेल्या अनेक नेत्यांना विधानसभेचं तिकिट


शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याबाबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा होकार?


आता ही लिस्ट पाहिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये किती आनंद असेल हे सांगायची गरज नाही. बदलत्या जमान्याबरोबर राजकारणही बदलत चाललंय. हळूहळू शिवसेनेचा चेहरा मोहराही बदलत चाललाय. बाळासाहेबांच्या काळात जुन्या आणि कट्टर सैनिकांना स्थान देण्यात यायचं तेच आता उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या जमान्यात नवीन आणि ग्लॅमरस चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जातंय. हो म्हणजे असं झालं शाखा चालवायची सैनिकांनी आणि तिकिटं मिळवायची नविन चेहऱ्यांनी. पुढे अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तळागाळात काम करणारे शिवसैनिकांना वेळीच संधी दिली गेली नाही तर भविष्यातलं चित्र वेगळं असेल.