Panvel Municipal Corporation : तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना विवाह नोंदणी करणं सोपं जाणार आहे. यासाठी आता पनवेल महापालिकेनं पुढचे पाऊल उचलले आहे. यापुढं नागरिकांना विवाह नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात ये जा करावी लागणार नाही. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नागरिकांना 1 एप्रिलपासून विवाह नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.


पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील नागरिकांना 1 एप्रिलपासून ऑनलाईन पध्दतीने विवाह नोंदणी करता येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने 'मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल' सुरु करण्यात आले आहे. नुकतेच या पोर्टलचे ट्रेनिंग अ, ब, क, ड या चार प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना  देण्यात आले आहे. बदलत्या काळाप्रमाणं महापालिकाही दिवसेंदिवस वेगवेगळे बदल होत आहेत. ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी 'PMC TAX APP' आणि क्यू आर कोडची सोय देकील  महापालिकेनं केली आहे. त्यानंतर आता नागरिकांना 1 एप्रिलपासून विवाह नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. यासाठी महापालिकेने 'मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल'सुरु केले आहे. नोंदणी इच्छुक नागरिकांनी या  लिंकवरती जाऊन http://pmc.marriagepermission.com आपली सर्व माहीती भरावयाची आहे. 


दरम्यान, याबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या माहीतीची छाननी केली जाईल. दर सोमवारी आणि गुरुवारी 10 ते 12 यावेळेत या नोंदणी इच्छुक नागरिकांना बोलण्यात येणार असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. दिलेल्या तारखेस येताना नागरिकांनी आपल्या मूळ कागदपत्रांचा छायांकीत प्रत असलेला एक सेट सोबत घेऊन यावे. त्याचवेळी त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. महापालिकेच्या मुख्यालय सोडून  खारघर'अ',कळंबोली 'ब',कामोठे'क',पनवेल'ड' या प्रभाग कार्यालयात नागरिकांसाठी ही विशेष सुविधा देण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: