Tata power : आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात काही मोठे बदल होणार आहेत. आजपासून ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. अनेक वस्तू महागणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी देखील या नवीन वर्षात मिळाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महावितरणचे वीजदर कमी होणार आहेत. तसेच टाटाचे वीजदर देखील कमी होणार आहेत. त्यामुळं घरघुती वीजधारकांना दिलासा मिळाला आहे. तसेच बेस्टच्या दरातही काही बदल झालेला नाही.
वीजदरात किती सवलत
नवीन आर्थिक वर्षात वीजदर कमी करण्यात आले आहेत. महावितरणचे वीजदर दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर दुसरीकडे अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्टचे वीजदरही स्थिर राहणार आहेत.
आजपासून लागू होणाऱ्या नव्या वीज दराप्रमाणे टाटाच्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या ग्राहकांच्या वीजदरात 4 टक्के कपात होईल, तर महावितरणचे दर 2 टक्क्यांनी कमी होतील. दुसरीकडं अदानीच्या वीजग्राहकांच्या बिलात युनिटमागं 1 ते 6 पैशांची वाढ होणार आहे. त्यामुळं महिन्याचे बिल 30 रुपयांनी वाढणार आहे.
आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-2023 सुरु झाले आहेत. या नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात आर्थिक बाबतीत काही मोठे बदल होणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. दुसरीकडे आज सामान्यांच्या जीवनाशी संबंधित अन्य काही गोष्टीही बदलत आहेत. आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आजपासून आयकर नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आयकर (25 वी सुधारणा) नियम 2021 अंतर्गत 1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत.
महाराष्ट्रात आजपासून काय बदल होणार
- 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात करोनाचे सर्व निर्बंध हटतील
- मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील
- गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
- केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
- मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
- हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
- लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.
- बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही.
- सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.
- महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार
- निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या: