Sasoon Hospital Drug Racket: ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) बंगळुरूमधून अटक केल्यानंतर त्याला साकीनाका पोलिसांनी आज अंधेरीतील न्यायालयात (Andheri Court) हजर करण्यात आलं. सोमवारपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस ललित पाटील साकिनाका पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. त्यानंतर पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलकडून करण्यात आल्याचं कोर्टात उपस्थित असलेल्या एका वकिलांनी एबीपी माझाला सांगितलं आहे. ललित पाटील कुठे आणि कसा पळून गेला? याबाबतची कोणतीही चर्चा कोर्टात झाली नसल्याची माहिती मिळत आहे. 


ललित पाटीलला न्यायालयात हजर केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "आज ललित पाटीलला हजर केल्यानंतर आरोपीनं माझ्या जिवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचं सांगितलं. त्यानंतर न्यायालयाकडून ललित पाटीलला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे ललित पाटीलला न्यायालयीन कोठडीत पाठवावं अशी विनंती केली. मात्र, सरकारी वकिलांनी सांगितलं की, हे ड्रग रॅकेट खूप मोठं आहे. यामध्ये 12 आरोपी आहे, पोलिसांनी ज्या बाराव्या आरोपीला अटक केली, त्यावेळी त्यानं सांगितलं की, तो कच्चा माल ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलला पुरवायचा आणि त्यानंतर ललित पाटील तो घ्यायचा. हे संपूर्ण ड्रग रॅकेट ससून रुग्णालयातून ऑपरेट केलं जात होतं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं. 


ललित पाटील प्रकरणात अंधेरी कोर्टात नेमकं काय झालं ?


सरकारी वकिलांकडून या सगळ्या ड्रग्स प्रकरणांमध्ये साकिनाका पोलिसांना पुढील चौकशीसाठी ललित पाटील ची रिमांड मिळावी असं कोर्टासमोर सांगण्यात आलं.


नाशिक कारखान्यावर झालेल्या ड्रग कारवाई मध्ये ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यासाठी जो आरोपी मदत करत होता त्याने ललित पाटीलचा नाव चौकशी दरम्यान घेतलं.


त्यामुळे या सगळ्या प्रकरणात ललित पाटीलचा मोठा रोल आहे तो मुख्य सूत्रधार या सगळ्या ड्रग रॅकेटचा आहे आणि त्याच्यावर मुंबई नाशिक पुणे पोलिसात गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई पोलिसांना करायची असल्याचं सरकारी वकील यांनी कोर्टासमोर सांगितलं.


ललित पाटील ची बाजू मांडणाऱ्या वकील नसल्याने लीगल ऐड म्हणून कोर्टाकडून वकिल देण्यात आला... मात्र त्यांना युक्तिवाद करण्यास फारसा वेळ मिळाला नाही आणि कोर्टाने मुंबई पोलिसांना ललित पाटीलचा ताबा देण्यास परवानगी दिली.


कोर्ट रूम बाहेर ललित पाटील ने आपल्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना आपल्याला पुणे पोलिसांकडून आपल्याला जीवाला धोका असल्याचं सांगितलं.


मात्र कोर्ट रूम मध्ये ललित पाटीलला बोलू दिलं नाही आणि अंधेरी कोर्टाकडून सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सोमवारी पुन्हा एकदा ललित पाटील या सगळ्या प्रकरणात अंधेरी कोर्टात हजर केल जाणार आहे.


ललित पाटील चा भाऊ भूषण पाटील याची सुद्धा रिमांड मुंबई पोलीस मागण्याची शक्यता आहे


माझ्याविरोधात पुरावेच नाहीत, ललित पाटीलची कोर्टाच माहिती 


आरोपी ललित पाटीलनं त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप न्यायालयात फेटाळून लावले आहेत. तसेच, माझ्याविरोधात पुरावे नसल्याचंही ललित पाटीलनं सांगितलं. पण यावर बोलताना पोलिसांनी आमचा तपास सुरू आहे, याप्रकरणातील बाराव्या आरोपीनं चौकशी दरम्यान ललिट पाटीलचं नाव घेतल्याचं सांगितलं. गेल्या कित्येक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ललित पाटीलला अटक करण्यात आली. आज वैद्यकीय तपासणीनंतर ललित पाटीलला कोर्टात हजर करण्यात आलं. 


दरम्यान, ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवलं गेलं असा दावा ड्रगमाफिया ललित पाटीलने एबीपी माझासमोर केला आहे. तसेच यात कोणाकोणाचा हात आहे, हे सर्व सांगेन असा इशाराही ललित पाटीलनं दिला आहे. ललित पाटील करत असलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ललित पाटील ज्या प्रकारे ससूनमधून पळाला तेव्हाच खरंतर संशयाची सुई निर्माण झाली होती. ललित पाटीलला नाशिक पोलीस शोधत असतानाच ललित पाटील नाशिकमध्येच होता ही गोष्टही समोर येत आहे. तसंच ललित म्हणतो त्याप्रमाणे ललितला पळवलं गेलं असेल तर यात कोण कोण सहभागी होतं याचा शोध घेतला गेला पाहिजे, तसेच ललितला पळवण्यात नेमका काय उद्देश होता, कोणाकोणाची नावं तपासात लपवली जात आहेत का हे प्रश्न ललितच्या दाव्यामुळे उपस्थित होत आहेत. 


ललित पाटीलच्या भावाला अयोध्येतून अटक


ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील आयोध्येजवळून ताब्यात घेतलं आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेदेखील पसार झाले होते. भूषण पाटील हा केमिकल इंजिनियर आहे. त्याने मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याचं काम करत होता.  भूषण पाटील मेफेड्रॉन तयार करायचा, अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा तर ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा.


ललित पाटील ससूनमधून पळाला


ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार असलेला ललित पाटील हा पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. 2 ऑक्टोबरच्या रात्री ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. ललित पाटील अंमली पदार्थांची तस्करी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 1 ऑक्टोबरला ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे आमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ललित पाटील पसार झाला होता.


पाहा व्हिडीओ : Lalit Patil Arrested : ललित पाटीलला कोर्टात हजर केल्यानंतर नेमकं काय - काय घडलं?



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Lalit Patil Arrested : इकडे ललित पाटीलचे गौप्यस्फोट, तिकडे सुषमा अंधारेंनी वात पेटवली, दुसऱ्या नेत्याचंही नाव घेतलं!