मुंबई : राज्याच्या गृहखात्यावर ढीगभर प्रश्न आणि भलामोठा ठपका ठेवून मोकाट फिरणारा ड्रग्जमाफियाला (Drug Racket Case)  मुंबई पोलीसांनी ललित पाटीलला (Lalit Patil)  अटक केली. पण ललित पाटील प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल ललित पाटीलचे फाईव्ह स्टारमधील फोटो समोर आले. तर आज ललित पाटील या ड्रग्जच्या काळ्या धंद्यातून लाखो रूपये कमवत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. ललित पाटीलच्या महिन्याच्या रकमेचा (Lalit Patil Monthly Income) आकडा ऐकून तुमचे डोक गरगरेल सर्वसामान्य  व्यक्तीला आयुष्यभर नोकरी करून जेवढे कमवता येणार नाही तेवढी कमाई तर ललित पाटीलची महिन्याची आहे.


ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील त्यांच्या नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरीतून दर महिन्याला  50 लाखंचा निव्वळ नफा कमवायचे, ही माहिती  पोलिसांच्या तपासात  उघड झाली आहे. 2021 सालापासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होता. दर महिना 50 किलो एमडीची  निर्मिती करायचे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये  एमडीची विक्री ते करत होते. ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने  एमडीचा पुरवठा सुरू होता. आत्तापर्यंत  या प्रकरणात 16 आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक  केली. तर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्यांचा साथीदार अभिषेक बलकवडेचा देखील लवकरच घेणार मुंबई पोलीस ताबा घेणार आहेत.  


ललित पाटीलचे फाईव्ह स्टार हॉटेलमधील फोटो समोर


ड्रगमाफिया ललित पाटीलचा येरवडा कारागृहात असला तरी त्याचा मुक्काम हा फक्त नावापुरताच होता का? असा सवाल उपस्थित होतोय  याचं कारण तुरुंगात असताना ललित पाटील 2020 पासूनचे एक्स्क्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेत. यातील काही फोटोंमध्ये ससूनमधील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमध्ये बसून ललित पाटील चक्क सिगारेट ओढताना दिसतोय. तर इतर फोटोंमध्ये ललित पाटील हा प्रेयसी प्रज्ञा कांबळेसोबत पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मौज मजा करताना दिसतोय. तर ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा हुक्का पितानाचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती आलाय.तरुणाईला नशेच्या खाईत ढकलणाऱ्या ललित पाटीलच्या फोटो पाठोपाठ नशा करतानाचा व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे येरवडा कारागृहाचं प्रशासन आणि ससून रुग्णालयाचं व्यवस्थापन ललित पाटीलने कसं आपल्या मुठीत ठेवलं होतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 


गुन्हेगारी आणि राजकारण यांना एकत्र सांधत ललित पाटीलने आपलं ड्रग्जचं साम्राज्य उभं केलं पण खरी चिंता ही आहे की ललित पाटील जेलमध्ये गेल्यावरसुद्धा हे साम्राज्य बिनदिक्कत सुरू राहिलं. याचा अर्थ ड्रग्जसारख्या गंभीर विषयावरसुद्धा आपली पोलीस व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था गंभीर नाही. ललित पाटीलने अटक झाल्यावर केलेलं वक्तव्य त्याचंच द्योतक आहे. ललित पाटीलचा सगळा प्रवास हा फक्त त्याच्या कुटुंबियांसाठीच नाही तर व्यवस्था आणि समाजासाठीही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.


हे ही वाचा :


Lalit Patil : एकीने आसरा दिला, दुसरीकडे 25 लाख ठेवले, अय्याशी ते रासलिला, ललित पाटीलचा कारनामा!