Lalbaugcha Raja मुंबई: ढोल-ताशांचा आवाज, डीजेचा दणदणाट, गुलालाच्या उधळणीमुळे गुलाबी झालेला आसमंत आणि 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष, अशा उत्फुल्ल वातावरणात श्री गणरायांना मंगळवारी समस्त भक्तगणांनी भावपूर्ण निरोप दिला. रिकाम्या झालेल्या मखरामुळे डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या भक्तांनी लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घातली.


मुंबईतील जगभरात प्रसिद्ध असणार लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंगळवारी सकाळी 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता, यंदा राजाच्या मिरवणुकीला अंतर पार करण्यास तब्बल 20 ते 24 तास लागले, कोळी बांधवांनी ब्रास बैंड आणि बोटींच्या माध्यमातून समुद्रात लालबागच्या राजाला बुधवारी सकाळी सलामी दिली. त्यानंतर राजा तराफ्यावर बसून विसर्जनास सज्ज झाला. यावेळी अनंत अंबानी देखील लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाले होते. 


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाला सोन्याचा मुकूट भेट दिला होता. या मुकुटाचं वजन 20 किलो एवढं आहे. तर, किंमत 15 कोटी रुपये आहे. हे मुकूट बनवण्याकरता कारागीरांना दोन महिने लागले होते. लालबागच्या राजाच्या विसर्जनाआधी गिरगाव चौपाटीवर हे मुकूट काढण्यात आले. सध्या हे मुकूट लॉकरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चौपाटीवर काढलेल्या मुकूटाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 






अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती-


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेण्यात आला. 


लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान-


गणेशभक्तांनी लालबागच्या राजाला यंदाच्या वर्षीदेखील भरभरुन दान केल. लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रुपयाचे रोख रकमेचे दान भाविकांनी केलं आहे. तर, 4151.360 ग्रॅम सोनं लालबागच्या राजा चरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आलं आहे. तर 64321 ग्राम चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान म्हणून अर्पण करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.


संबंधित बातमी:


VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!