पालघर : पालघरमधल्या रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे एका महिला बाईक रायडरचा मृत्यू झाला आहे. जागृती होगाळे असं मृत बुलेटस्वार बाईक रायडरचं नाव आहे.

डहाणू-जव्हार रोडवर बाईक राइडिंग करताना वेतीजवळ हा अपघात झाला. मुंबईहून पालघरला येत असताना ट्रकला ओव्हरटेक करताना रस्त्यात बाईक आदळल्याने जागृती कोसळल्या आणि रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला.

दर रविवारी रायडर या परिसरात येत असतात. तसंच या मार्गावर आतापर्यंत 4 रायर्डर्सचा मृत्यू झालाय. खड्ड्यांमुळे सतत वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर येत आहेत. तरीही प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी काहीही हालचाली होत नसल्याचं चित्र आहे.