मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावरुन जोरदार वादंग उठलं आहे. ज्या गाडीत स्फोटकं होती त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळून आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी एक नाव आहे ते म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे याचं. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव पहिल्यांदाच चर्चेत आलेलं नाही. याआधीही काही प्रकरणांमध्ये वाझे यांचं नाव समोर आलं होतं. विशेष म्हणजे वाझे यांच्या शिवसेनेशी असलेल्या जवळीकीवरुन त्यांच्यावर भाजपसह विरोधकांनी जोरदार आरोप केले. आता या प्रकरणात सचिन वाझेंना अटक देखील झाली आहे. हे सचिन वाझे नेमके कोण आहेत? (Who is Sachin Vaze) हे जाणून घेऊयात.


Sachin Vaze : अखेर सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण? 

कोण आहेत सचिन वाझे?


सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.


नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.


सचिन वाझे करीब 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.


वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.


सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.


सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.


30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.


2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.


Sachin Vaze : 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय', सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस!


मुख्यमंत्री म्हणाले,  वाझे म्हणजे ओसामा असं चित्रं निर्माण केलं जातंय
या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं आणि चारित्र्यहनन करायचं, हे आम्ही नाही करणार. एवढं झाल्यावरही मनसुख हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही." पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, "मनसुख हिरण मृत्यूप्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार; तर सचिन वाझे यांचा सध्या शिवसेनेशी कोणताही संबंध नाही."