उल्हासनगर : मुंबईत गुन्हेगारी घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यात पोलिसांवरील हल्ले देखील वाढत आहेत. गुरुवारी मध्यरात्री उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Maharashtra Police : पोलिसांसाठी गुड न्यूज! हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार
गुरुवारी मध्यरात्री उशिरा सेक्शन 30 परिसरात हा प्रकार घडला आहे. माहितीनुसार संजय शितलानी यांचे नरेश लेफ्टी याच्या सोबत पैशावरून वाद होते. नरेश हा संजयकडे वारंवार पैशाची मागणी करत होता, याच वेळी अविनाश नायडू याने संजय कडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. संजय आणि अविनाश हे मध्यरात्री नरेशला सेक्शन 30 भागात भेटले, यावेळी दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन नरेशच्या टोळीने सोबत आणलेल्या चाकू ने संजय आणि अविनाश वर वार केले. यावेळी पोलिस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे गस्तीवर होते, त्यांनी हा सगळा प्रकार पहिला आणि तो थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र नरेश आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर चाकूने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे स्वतःकडे कोणतेही सरकारी शस्त्र नसताना पोलिसांनी जीवावर उदार होऊन हिंमतीने हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हा हल्ला रोखला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती. या हल्लात संजय शितलानी आणि अविनाश यांच्या वर देखील वार झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणून गंभीर दुखापत या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शोधण्यासाठी पाच पथक नेमण्यात आली आहेत.