Kishori Pednekar : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिपळूणमध्ये राडा झाला. त्यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी चिपळूणमध्ये सभा घेत भास्कर जाधव यांना शिवीगाळ केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणेंवर टीका केली आहे. भर स्टेजवरुन आईवरुन शिव्या देतात. महिलांचा अपमान करतात. , असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या आहेत.यावेळी बोलताना पेडणेकर यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा अस्वल म्हणून उल्लेख केलाय. मुंबईतील लागबाग येथे ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मेळावा सुरु आहे. यावेळी त्या बोलत होत्या.
लोकांनी उद्धव ठाकरे यांना पसंती देऊन 56 आमदार निवडून दिले
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 2019 हा आपला सुवर्णकाळ होता. लोकांनी उद्धव ठाकरे यांना पसंती देऊन 56 आमदार निवडून दिले. बाळासाहेब गेल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की आता पुढे काय होणार? पण उद्धव ठाकरे यांनी हजारो पावलांनी पक्ष पुढे नेला.
कोरोना काळात ज्या पद्धतीने काम करण्यात आलं, त्याच क्रेडिट आम्हाला मिळू नये म्हणून षडयंत्र रचलं गेलं.
रामदास कदम यांच्यावर भांडी घासण्याचीच वेळ आलीये
त्रास आम्हाला होत नाही, तर जे गेले त्यांना त्रास होतोय. यांना का गेलो आणि कशासाठी गेलो माहिती नाही. काल नेत्याचे भाषण ऐकलं. त्याला अस्वल असं म्हटलं जात. आमदार स्टेजवर म्हणाला होता की मला 50 कोटींची ऑफर आली पण मी जाणार नाही. आम्हाला नाही माहिती की, तुम्ही घेतले की नाही. मात्र, तुम्हीच सांगितले ऑफर होती. मग रामदास कदम जवळच बसतात त्यांना सांगा. तुमच्यावर भांडी घासण्याची वेळ आलीच आहे, असे प्रत्युत्तरही पेडणेकर यांनी रामदास कदम यांना दिले.