मुंबई : भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने बोलणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्यांचा मोर्चा आता मुंबईतील वृक्षतोडीकडे वळवला आहे. घाटकोपरजवळील खंडोबा टेकडीच्या जंगलात बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिकेतील एल वॉर्डमधील अधिकारी या तिघांनी मिळून जंगलाचा सत्यानाश केल्याचा आरोप त्यांनी केला. या ठिकाणी जेसीबी लाऊन शेकडो झाडांची कत्तल केली. त्याची तक्रार केल्यानंतरही महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. 

Continues below advertisement


घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीच्या जंगलात जेसीबी लावून तीनशे ते चारशे झाडांची कत्तल करण्यात आली आहे. ही कत्तल एका प्रसिद्ध विकासकाने केल्याचे बोलले जात आहे. या वृक्षतोडीच्या विरोधात निसर्गप्रेमींनी जोरदार रोष व्यक्त केला आहे.


महापालिकेच्या संगनमताने झाडांची कत्तल 


या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच पवई पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल केला. या ठिकाणी विकासक, कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी मिळून ही वृक्षतोड केली आहे असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी हरित लवाद आणि पालिका आयुक्ताकडे तक्रार करणार आहे असंही ते म्हणाले. आरेचे, पवईचे जंगल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.


Aarey Forest Mumbai : आरेमध्ये बेकायदेशीर वृक्षतोडी 


किरीट सोमय्या म्हणाले की, "घाटकोपर, आरे हे सुरक्षित जंगल असून त्याची कत्तल सुरू आहे. मुंबईतील जंगल, आरे कॉलनी, पवई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झाडे तोडण्यात येत आहेत. या ठिकाणी झाडांच्या कत्तली सुरू आहेत. या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहे. यापुढे असं काही होऊ नये यासाठी कारवाई करण्याची मागणी करणार आहे."


ही बातमी वाचा: