मुंबई : डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील बेकायदा पाच मजली इमारतीवर केडीएमसीने अखेर पाडकामाची कारवाई सुरु केली. केडीएमसीच्या कारवाईमुळे या इमारतीत राहण्यास आलेली 40 कुटुंबे बेघर झाली आहेत. केडीएमसी प्रशासनाच्या कारवाईवर राहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही इमारत बांधली जात होती त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय झोपले होते का? असा संतप्त सवाल बेघर होणाऱ्या नागरिकांनी उपस्थीत केला आहे.
डोंबिवली पूर्व भागातील श्री दत्त कृपा ही पाच मजली इमारत वादग्रस्त ठरली होती. बेकायदा बांधकाम असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने या इमारतीला बेकायदा घोषीत केले होते. इमारतीचे काम सुरु होताच काही महिन्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली. मात्र काही महिन्यात इमारत पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली. आता पुन्हा या इमारतीवर केडीएमसीने कारवाई केली.
कारवाई दरम्यान चार तास पोलीस आणि इमारतीत राहणाऱ्या रहिवाशामध्ये गोंधळ सुरु होता. पोलिसांनी बळजबरीने इमारत रिकामी केली. त्यानंतर तोडून कारवाई सुरु झाली. रहिवाशांनी यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला.
महिला रहिवासी रेखा कांबळे यांनी सांगितले की, 1970 सालापासून या जागेवर आमची इमारत होती. इमारत धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली. आम्ही चाळीस कुटुंबीयांनी मिळून ही इमारत बांधली आहे. आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढले. कोणतीही नोटीस आणि पूर्व सूचना न देता ही कारावाई केली आहे.
यासंदर्भात प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी सांगितले, सध्या कारवाई सुरु आहे. संपूर्ण कारवाई झाल्यावर आम्ही याविषयीची माहिती देऊ. मात्र इमारतीचे काम सुरु होते तेव्हा अधिकारी कुठे होते याचे उत्तर देणे कांबळे यांनी टाळले.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane : नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी
- Nitesh Rane :नितेश राणेंना जामीन मिळणार का याकडे लक्ष,परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम
- Ajit Pawar speech:अजित पवारांनी नितेश राणे यांचे काने टोचले,आपण कुत्र्या-मांजराचं नेतृत्व करत नाही!