मुंबई : मुंबईच्या कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी पबचे मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना अटक केली आहे.

पोलिसांनी संघवी बंधूंना 10 जानेवारीला वांद्रे परिसरातून अटक केली. तर या अग्नितांडवातील तिसरा फरार आरोपी अभिजीत मानकरला 11 जानेवारीला बेड्या ठोकण्यात आल्या.

अनेक हॉटेल आणि पबचा मालिक असलेल्या विशाल कारियाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली होती. 'वन अबव्ह'च्या मालकांना पोलिसांपासून वाचवण्याचा आणि स्वत:च्या घरात आसरा देण्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशाल करियाकडूनच पसार असलेला आरोपी अभिजीत मानकरची कारही जप्त करण्यात आली होती.

विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड? 

"चौकशीनंतर विशाल कारियाने दिलेल्या माहितीच्या आधारावर, कमला मिल्समधील अग्नितांडवानंतर पसार असलेल्या संघवी बंधूंना वांद्रे परिसरातून अटक केली," असं पोलिस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी सांगितलं.

कमला मिल्स परिसरातील आगीत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. संघवी बंधू आणि अभिजीत मानकर 29 डिसेंबरच्या घटनेनंतर पसार झाले होते. या तिघांबद्दल माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी एक लाख रुपयांचं इनामही घोषित केलं होतं.

काय आहे प्रकरण?
कमला मिल्स कम्पाऊंडमधील '1 अबव्ह' पबला गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या :

'कमला मिल आगीची सीबीआय चौकशी करा'

कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक

कमला मिल अग्नितांडव : मोजोसच्या मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'

कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त

कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार

कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक

कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा

मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे

अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू

कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस

बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार


अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई


1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान


हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री


कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित


भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील


कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!


कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!


कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'


कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...


कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली


मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू


मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ