- कृपेश संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)
- जिगर संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)
- अभिजीत मानकर (हॉटेल वन अबव्ह) (11 जानेवारी सकाळी)
- विशाल कारिया (आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप) (9 जानेवारी सकाळी)
- युग पाठक (मोजोस बिस्त्रोचा दुसरा मालक)
- युग तुली (मोजोस बिस्त्रोचा मालक) (15 जानेवारी रात्री)
- केविन केणी बावा (मॅनेजर, 'वन अबव्ह') - (1 जानेवारी )
- लिसबन स्टेनील लोपेज (मॅनेजर, 'वन अबव्ह') (1 जानेवारी )
- रवी भंडारी (कमला मिल्सचा भागीदार) (20 जानेवारी)
- राजेंद्र पाटील अग्निशमन दलाचे अधिकारी (20 जानेवारी)
- उत्कर्ष पांडे (मोजोस बिस्त्रो, वन अबव्हला हुक्का पुरवणारा) (20 जानेवारी)
कमला मिल्सचा मालक-संचालक रमेश गोवानीला अटक
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2018 07:45 AM (IST)
या गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानंतर ना म जोशी मार्ग पोलिसांनी गोवानीना सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या.
फाईल फोटो
मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडचा मालक आणि संचालक रमेश गोवानीला चेंबूरमधून अटक करण्यात आली आहे. कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रमेश गोवानीला आज भोईवाडा कोर्टात हजर केलं जाईल. कमला मिल्स कम्पाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानंतर ना म जोशी मार्ग पोलिसांनी गोवानीना सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी वन अबव्हचे मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह मोजोस बिस्त्रोचे मालक युग पाठक आणि युग थुली यांना अटक केली होती. तसंच आरोपींना आश्रय देऊन पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी विशाल कारियालाही बेड्या ठोकल्या. याशिवाय कमला मिल्सचा भागीदार रवी भंडारी, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील आणि दोन्ही रेस्टोपबला हुक्का पुरवणार्या उत्कर्ष पांडेला अटक केली होती. वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या दोन्ही रेस्टोपबमध्ये अवैधरीच्या हुक्का पार्लर चालवण्यासोबत, अवैधरीत्या केलेल्या बांधकामाची माहिती रमेश गोवानीला होती. तरीही त्याने याकडे दुर्लक्ष केला. आरोपींच्या चौकशीतून गोवानीचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला आणि चौकशीअंती सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आलं. कमला मिल आगीप्रकरणी कोणाकोणाला अटक?