कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवल वाढत असल्याने पालिका आयुकतांनी अनेक निर्बंध घातले आहे. आता पालिका मुख्यालय आणि प्रभाग क्षेत्र कार्यालयात नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक कामे असतील तरच नागरिकांनी कार्यलयात यावे अन्यथा ऑनलाइन सेवेचा पर्याय स्वीकारावा.  तसेच लोकप्रतिनिधीनी देखील संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत कामे करावीत आणि अत्यावश्यक काम असल्यासच कार्यालयात यावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत तसंच करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून व्हिजिटर्स डे देखील तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.


कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊनला विरोध होत आहे. त्या परिस्थितीत कोरोना आटोक्यात आणण्याचे दिव्य प्रशासनाला पेलावे लागणार आहे. यामुळेच केडीएमसी आयुक्तांनी यापूर्वीच नागरिक व्यापारी लोकप्रतिनिधी यांच्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत आता महापालिका मुख्यालयातील आणि प्रभाग क्षेत्र कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांना आवश्यक कामकाज बघता प्रवेश मर्यादित केले आहेत. तसेच माजी पालिका सदस्य व पदाधिकारी विविध संस्थांनी संघटनांचे पदाधिकारी यांनीदेखील दूरध्वनीवरून अधिकार्‍यांशी संपर्क साधावा आणि आवश्यकता भासल्यास जर मुख्यालयात किंवा प्रभाग कार्यालयात भेटीसाठी यावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे .


नागरिकांनी महापालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेत स्थळावर संपर्क करावा कर भरणा असेल तसेच अन्य देयके भरण्यासाठी नागरिकांनी डिजिटल ऑनलाईन सेवेचा वापर करावा तसेच ज्या नागरिकांना ऑनलाईन सेवेचा वापर करता येत नाही त्यांना मर्यादित स्वरूपात नागरी सुविधा केंद्रात प्रवेश दिला जाईल. तसेच अधिकाऱ्यांनी बैठका देखील तातडीची गरज असेल तरच आयोजित कराव्यात आणि महापालिके बाहेरील व्यक्तींना अधिकाऱ्यांना बोलावले जाऊ नये, असे आदेश देतानाच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून व्हिजिटर्स डे देखील तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.