कल्याण : जागतिक महामारी असणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असे वाटत असतानाचा मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा एकदा स्फोट होताना पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची मागील दिवसांतील वाढती रुग्णसंख्या पाहता शासनानेही नवे निर्बंध लावले असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतरर्गत देखील मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु करण्यात आली असून केवळ दोन दिवसांत एक लाख रुपये इतका दंड आकरण्यात आला आहे.


कल्याण डोंबिवली महापालिका आणि पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरु झाली असून गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीमधील 10 प्रभांगामध्ये पथकं तैनात करण्यात आली असून गर्दीच्या ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी चौकातील नियम मोडणाऱ्या दुकानदारांसह विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांना मास्क वापरण्याच आवाहन यावेळी पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आलं. दरम्यान मागील गेल्या दोन दिवसांत अनेक विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत पालिकेने तब्बल 1 लाख 3 हजार 500 रुपये इथका दंड आकरला आहे.


मुंबईत रविवारी 19 हजारांहून अधिक रुग्ण


मुंबईत रविवारी 19 हजार 474 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सात मृत्यूची नोंद नाही. याशिवाय, 8 हजार 63 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळं मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 78 हजार 119 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर गेलाय.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha