मुंबई : दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली. ज्यावर शेरेबाजी करत नाईकांनीही पलटवार केलेला. मात्र, इतक्यातच हे वाग्युद्ध थांबणाऱ्यातलं दिसत नाहीये, आज पुन्हा आव्हाडांनी नाईकांना टोला हाणला. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग मारतो. कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही, असा टोला आव्हाड यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे.


नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावर भाजप नेते गणेश नाईक यांनीही आव्हाडांना उत्तर दिलं. "तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक", असं उत्तर नाईक यांनी दिलं होतं.

तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज.. : गणेश नाईकांचं जितेंद्र आव्हाडांना उत्तर

बाप बदलणाऱ्याची औलाद माझी नाही
माझा बाप काढला याचं मला दुःख नाहीय. कारण, माझा एकच बाप आहे. गणेश नाईक यांनी सतत बाप बदलेल, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. नाईक यांनी 90 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलल्याचं म्हटलं. अशी बाप बदलणाऱ्याची औलाद माझी नाही. माझा मरेपर्यंत एकच बाप आहे. जेव्हा गरीब आगरी समाजाची घरं पडत होती. त्यावेळी नाईक तुम्ही कुठं होता. ही घरं वाचवण्यासाठी सीमांकन का वाढवलं नाही?, स्वतःच बावखळेश्वर मंदिर वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. मग, गरीब आगरी समाजासाठी तुम्ही का लढले नाहीत, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. ज्या समाजावर तुम्ही मोठं झालात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? जे तुम्हाला मिळालं ते माझ्या बापामुळेच. कारण, शरद पवार माझा बाप आहे, असंही आव्हाड सांगायला ते विसरले नाहीत. गणेश नाईक यांनी आजपर्यंत फक्त पैशाच्या जीवावर राजकारण केलं. मात्र, मी निष्ठेच्या जीवावर राजकारण करतो. त्यामुळे नवीमुंबईची लढाई ही गद्दार विरुद्द निष्ठावंत अशी होणार असल्याचंही आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.

गणेश नाईक, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला!
गणेश नाईक यांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट लिहीत गणेश नाईक, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला!, असं जाहीर आव्हान केलंय. "प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे." असल्याचं आव्हाड यांनी लिहलंय.

jitendra Awhda Vs Ganesh Naik | बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, जितेंद्र आव्हाड यांचं नाईक यांना प्रत्युत्तर | ABP Majha