मुंबईः विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके यांची पत्नी प्रेमलता आणि मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचा मुलगा अपूर्व जावडेकर यांनी मुख्यमंत्री कोट्यातील म्हाडाचे घरं परत केले आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.

 

म्हाडाचे घरं कोणकोणत्या नेत्यांनी परत केले आहेत, हे पाहण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अर्ज केला होता. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. प्रेमलता पुरके यांनी 27 एप्रिल 2012 रोजी, तर अपूर्व जावडेकर यांनी 9 डिसेंबर 2013 रोजी घर परत केलं आहे.

 

मुख्यमंत्री कोट्यातील घरे गेल्या 10 वर्षापासून विकण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्व घरांची चौकशी करुन घरे लाटणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असं पत्र गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.