द जपान फाऊंडेशनमार्फत विविध प्रकल्प कार्यालयातील कर्मचार्यांना जपानी भाषा अवगत शिकल्यानंतर प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. जपानी भाषा आणि संस्कृती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. पाच महिन्याचा हा अभ्यासक्रम आखण्यात आला होता.
72 कर्मचार्यांनी हे प्रशिक्षण एनएचआरसीएलच्या मुंबई, बडोदा, पालघर, अहमदाबाद, सुरत आणि दिल्लीतील कॉर्पोरेट ऑफिसमधील पुर्ण केले आहे. हायस्पीड रेल टेक्नॉलॉजी ही जपानी शिन्कसेन ट्रेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अवगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये भाषेच्या व्यवहारासाठी तसेच भाषा अवगत करण्यासाठीची गरज म्हणून हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता. एनएचआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रमाणपत्राचे वितरीत करण्यात आले.
हा संपुर्ण अभ्यासक्रम जपान फाऊंडेशनने हा अभ्यासक्रम तयार करताना जपानी भाषा संभाषणासाठी शिकणे आणि जपानी संस्कृती शिकणे यासारख्या गोष्टींचा यात समावेश केला. गेल्या दीड वर्षांपासून हा अभ्यासक्रम एनएचआऱसीएलमध्ये राबविण्यात येत असून एनएचआरसीएलच्या 140 कर्मचाऱ्यांनी ही भाषा शिकली आहे.
काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
- मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.
- यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे
- या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.
- मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स
- ताशी 350 किमी धावण्याची क्षमता
- अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात
- बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे.
- एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
- सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
- फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.
बुलेट ट्रेन तिकिटाचे संभाव्य दर
- मुंबई-अहमदाबाद - 3000 रुपये
- बीकेसी-ठाणे - 250 रुपये
- मुंबई-अहमदाबाद (बिजनेस क्लास) - 3000 रुपयांहून अधिक
- एका बुलेट ट्रेनमध्ये 10 डब्बे असतील. ज्यामध्ये एक बिजेनस क्लास असेल.
- बुलेट ट्रेन प्रकल्पात 24 ट्रेन्स येणार आहेत. सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनवण्यात येणार आहेत. दहा डब्यांच्या ट्रेनची आसन व्यवस्था 750 इतकी असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसनं असतील.
- 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
कोणकोणत्या सुविधा
- उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
- महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहं
- प्रवासी आजारी असल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
- डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
- स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
- स्वयंचलित ब्रेक यंत्रणा