Janhavi Gadkar Drunk Driving Case : मुंबई : कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरचा समावेश असलेल्या 2015 च्या दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी तत्कालीन भारतीय दंड संहितेअंतर्गत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे. तसेच, जान्हवी गडकरवर सदोष मनुष्यवधासह हत्येचाही आरोप लावणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. दरम्यान, वकील जान्हवी गडकरनं मुंबईत गाडी चालवत असताना तिच्या ऑडी कारनं टॅक्सीला टक्कर दिली होती. या अपघातात टॅक्सी चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या हे प्रकरण सत्र न्यायालयात आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे.
जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची मागणी राज्य सरकारनं केली आहे. सदोष मनुष्यवधासह हत्येचाही आरोप जान्हवी गडकरवर लावणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तसेच, आपण करत असलेल्या कृतीची जान्हवीला पूर्ण कल्पना होती, त्यामुळेच हत्येचा आरोप लावत असल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.
ईस्टर्न फ्री-वेवर 2015 मध्ये झालेल्या भीषण अपघाताचं प्रकरण आहे. मद्यधुंद अवस्थेत असताना चुकीच्या मार्गिकेतून ऑडी कार चालवत जान्हवी गडकरनं दिली होती. समोरून येणाऱ्या टैक्सीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला होता.
या धडकेत टैक्सी चालकासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला होता. जान्हवी गडकर कॉर्पोरेट वकील असून सध्या जामीनावर बाहेर आहे. कंपनीला मिळालेल्या एका मोठ्या प्रोजेक्टची पार्टी करून रात्री उशिरा दक्षिण मुंबईहून चेंबूर येथील निवासस्थानी परतत असताना फ्रि वेवर जान्हवी गडकरच्या गाडीं भीषण अपघात झाला होता.