Iqbal Singh Chahal BMC Commissioner : प्रसिद्ध गायक आणि पद्मश्री सोनू निगम याला धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते अमित साटम यांनी इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर आरोप केला होता. अमित साटम यांच्या आरोपावर इक्बाल सिंह चहल यांनी उत्तर दिले आहे. एबीपी माझाशी बोलताना इक्बाल सिंह चहल यांनी या आरोपाचं खंडन केले आहे.
एबीपी माझाशी बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले की, ‘सोनू निगम यांना ज्यानं धमकावल्याचा दावा केला जात आहे त्या राजेंदरशी माझा दूरदूरवर संबंध नाही. राजेंदर माझा चुलत भाऊ नाही. माझा जिथे जन्म झाला त्या राजस्थानचाच राजेंदर आहे. जर तो काही चूकीचे वागला असेल तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. ‘
दरम्यान, 23 फेब्रुवारी रोजी पद्मश्री सोनू निगम (Sonu Nigam) याने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. सोनू निगमला इक्बाल सिंह चहल यांच्याकडून एक पत्र आले होते. या पत्रात त्यांनी त्यांचा चुलत भाऊ राजिंदरच्या मार्फत परदेशात एका मैफिलीत गाणं सादर करण्याची विनंती केली होती. पण या पत्रातील राजिंदरने वापरलेली भाषा ही अपमानास्पद आहे. त्यामुळेच सोनू निगमने इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनू निगम याच्याकडे राजिंदरच्या अश्लील संदेशांचा ऑडिओ आणि स्क्रीनशॉट देखील आहे. राजिंदर हे इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत मुंबईतच राहतात. त्यामुळे सोनूने या प्रकरणात दखल घेण्याचे ठरवले आहे. जेणेकरून असे पुन्हा होऊ नये.
महत्वाच्या बातम्या :
Pratap Sarnaik on ED Enquiry : ईडी कारवाईविरोधात न्यायालयात अपील करणार : प्रताप सरनाईक
Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अडचणीत; ईडीकडून11.35 कोटींची संपत्ती जप्त
T. Harish Rao : शेतीसाठी 24 तास वीज असल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा
Navneet Rana : नवनीत राणांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, 'त्या' अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन, कठोर कारवाई करण्याची मागणी
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live