T. Harish Rao : वीज टंचाईमुळे त्रस्त असलेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेत असल्याचे वक्तव्य तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी केले. महागड्या विजेमुळे उद्योजक कर्नाटकात जात आहेत, तर मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत. शेतीसाठी 24 तास वीज पुरवठ्याच्या दृष्टीने तेलंगणातील जमिनीत शेतकरी गुंतवणूक करत असल्याचे टी हरीश राव यांनी सांगितलं. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत आहे. हा वीजपुरवठा देखील टप्प्यात होत आहे.


सिद्धीपेठ मतदारसंघात नर्सिंग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राव बोलत होते. महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार होते आणि आता काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. परंतू दोन्ही सरकारे या भागातील शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करु शकल्या नाहीत. तेलंगणामध्ये ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्या देशात इतरत्र कुठेही दिसू शकत नाहीत, असेही हरीश म्हणाले. केंद्र सरकारने रब्बी धानाची खरेदी न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असे हरीश राव म्हणाले.


दरम्यान, महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. तो वीजपुरवटा देखील व्यवस्थित होत नाही. अनेकवेळेला वीज खंडीत होण्याचा प्रकार घडतो. दरम्यान, ही आठ तास दिली जाणारी वीज कधी दिवसा तर कधी रात्रपाळीला दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळावी, अशी वेळोवेळी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील चांगलीच आक्रमक झाली होती. यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात आंदोलनही करण्यात आलं होते.  आहे. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून त्यांना मिळाले आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झाला आहे. दुसरीकडे राज्यात अन्यायी वीज बिलाची वसुली सुरु होती. सध्या ती थांबवण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देखील आली आहेत. अशा वीजे संदर्भात विविध समस्यांचा सामना राज्यातील शेतकऱ्यांन करावा लागत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: