मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या महाराष्ट्रात परतणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण त्या डीजीपी होणार की मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. तोपर्यंत डीजीपी पदाचा अतिरिक्त पदभार हा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. 


केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव हे रश्मी शुक्ला यांचं आहे. पण त्यांना महासंचालकपदी बसवलं जाणार की मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांची वर्णी लागणार याचा निर्णय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून घेणार आहेत. दरम्यान उद्यापासूनच महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर स्विकारतील. मुंबईचे महासंचालक रजनीश शेठ हे आजच निवृत्त झाले. त्यामुळे अद्याप रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रात येण्यास थोडा वेळ असून या कालावधीमध्ये त्यांच्याकडे कोणता पदभार द्यायचा यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल. 


Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट


पुणे पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोर्टाने असा अहवाल स्वीकारला की केस बंद केली जाते. एखादा गुन्हा चुकून नोंदवला गेला किंवा तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचे आढळून आल्यास पोलिसांकडून 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला जातो.


नेमकं प्रकरण काय?


मार्च 2021 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. दलालांमार्फत पोलिसांच्या बदल्या होत असल्याचा त्यांचा आरोप होता. या संदर्भातील तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राचा हवाला फडणवीस यांनी दिला होता. सोबतच कॉल रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव्ह देखील समोर आणला. त्यानंतर हा पेनड्राईव्ह पुढे केंद्रीय केंद्रीय गृह विभागाला तपासणीसाठी पाठवला. 


तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमधील गोपनीय पत्र उघड झाल्याचा गुन्हा अनोळखी व्यक्ती विरोधात दाखल केला होता. या प्रकरणात स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. हे प्रकरण कुलाबा पोलीस ठाण्यात वर्ग होण्यापूर्वी सायबर सेलच्या अंतर्गत होते. यावर एसआयडी अधिकारी कायोमेर्झ इराणी म्हणाले की, 'त्यांना संशय आहे की राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी डीजीपीला पाठवलेले पत्र फडणवीस यांना अज्ञात व्यक्तीने पाठवले होते.'


हेही वाचा : 


Samruddhi Expressway Damage : समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी रॉड अचानक आला वर; वाहनचालकाच्या समयसूचकतेमुळे टळला मोठा अपघात