iPhone Smuggling : मुंबई विमानतळावर 3,646 आयफोन-13 जप्त करण्यात आले आहेत.  महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)  ही कारवाई केली आहे असून या आयफोन्सची किंमत जवळपास 42.86 कोटी रुपये एवढी आहे. हे सर्व फोन सिंगापूरवरुन मुंबईत विमानतळावर आणण्यात आले होते. महत्वाची बाब म्हणजे कागदपत्रांमध्ये या कन्साईन्मेंटमध्ये मेमरी कार्ड असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ज्यावेळी तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात तब्बल 3 हजार 646 ‘iPhone 13’ आढळून आल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


आयफोन 13 हा भारतामध्ये सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आयफोन 13 च्या 128 GB मॉडेलची किंमत ही 79,900 रुपये इतकी आहे. आयफोन 13 च्या 256 GB मॉडेलची किंमत ही 89,900 रुपये इतकी आहे. तर आयफोन 13 च्या मिनी 128 GB मॉडेलची किंमत ही 69,900 रुपये आणि 256 GB मॉडेलची किंमत ही 79,900 रुपये  इतकी आहे. भारतात या आयफोनची आयात करायची असेल तर 44 टक्के आयात कर भरावा लागतो. 


 




3.7 कोटी रुपयांचे परकीय चलन बाळगणाऱ्या दोघांना अटक
दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन चेक शर्ट्स अंतर्गत माहितीचे विश्लेषण करून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) भारताबाहेर परकीय चलनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन प्रवाशांची माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे शुक्रवारी पहाटेच्या वेळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल हे दोघेजण शारजाहला जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्या बॅगची तपासणी केल्यावर त्यामध्ये 3.7 कोटी डॉलर मूल्याचे अमेरिकी डॉलर्स आणि सौदी दिऱ्हाम्स सापडले. 


संबंधित बातम्या :