मुंबई : देशभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांनी स्वतःच्या हक्कांच्या समर्थनार्थ दिलेल्या लढ्याच्या समर्थनार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. आंतराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात न्यूयॉर्क शहरातून झाली होती. 1908 मध्ये एका कामगार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जवळपास 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.


1910 रोजी क्लारा जेटकीन यांनी कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्या परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली होती.


जागतिक महिला दिन 2020 निमित्ताने एबीपी माझा जागतिक महिला दिन विशेष सप्ताह साजरा करत आहे. त्यानिमित्ताने समाजाच्या चौकटी मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा प्रवास उलगडणार आहोत. या सहा भागांच्या संपूर्ण सीरिजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आव्हानं पेलून, प्रसंगी परिस्थितीशी दोन हात करून या महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


एबीपी माझाच्या महिला दिन विशेष सीरिजचे सहा भाग तुम्हाला एबीपी माझाची वेबसाइट , यूट्यूब चॅनल वर पाहता येतील.


पाहा व्हिडीओ : Off Camera With Dnyanada Kadam| रिपोर्टर ते अँकर, कसा आहे ज्ञानदा कदमचा प्रवास?, पडद्यामागची ज्ञानदा



पाहा व्हिडीओ : Women Firefighter | आगीशी दोन हात करणाऱ्या अग्निशमन दलाच्या रणरागिणी | ABP Majha



पाहा व्हिडीओ : Dhanya Bank | धान्य बँकेच्या अन्नपूर्णा... उज्वला बागवाडे | ABP Majha



पाहा व्हिडीओ : Rickshaw Driver Smita Ramane | गृहिणी ते रिक्षाचालक, स्मिता रामाणे यांचा आव्हानात्मक प्रवास



पाहा व्हिडीओ : Women and Tobacco Addiction | महिलांमधील व्यसनाधीनता | डॉ. नीता घाटे यांचं मार्गदर्शन



पाहा व्हिडीओ : Mechanic Jayashree Bagwe | मेकॅनिक जयश्री बागवे यांची प्रेरणादायी कहाणी | ABP Majha