INS Vagsheer : भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत आयएनएस वागशीर ही पाणबुडी दाखल होणार आहे. आज या पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. 'प्रोजेक्ट 75' च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही सहावी पाणबुडी आहे. 


माझगाव डॉकने या पाणबुडीची बांधणी केली आहे. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. ' आयएनएन वागशीर' ही स्कॉर्पिन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. 


आज वागशीर पाणबुडीचे जलावतरण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी चाचणी आणि परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पाणबुडी युद्धासाठी पूर्णपणे तयार होणार आहे. ही पाणबुडी पूर्णपणे तयार झाल्यानंतर तिचा समावेश भारतीय नौदलात करण्यात येणार आहे. 


माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडने तयार केलेल्या वागशीर पाणडूबीत अत्याधुनिक तंत्रज्ञानसह स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही पाणबुडी स्कॉर्पीन कलावरी वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहे. 


आतापर्यंत माझगाव डॉक लिमिटेडने तयार केलेल्या स्कॉर्पिन वर्गाच्या कलवरी, खंडेरी, करंज , वेला या पाणबुड्यांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला आहे.  


आयएनएस वागशीर पाणबुडी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. कमी आवाजात शत्रूची सहज दिशाभूल करण्याची क्षमता असलेल्या आयएनएस वागशीरमध्ये 18 टॉर्पेडो वाहून नेण्याची क्षमता आहे. या पाणबुडीतून एकाच वेळी सहा टॉर्पेडो डागता येतात. शिवाय जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची या पाणबुडीची खासियत आहे. ही पाणबुडी 50 दिवस पाण्यात राहू शकते. आयएनएस वागशीर या पाणबुडीचे अंतर्गत तंत्रज्ञान फ्रेंच आणि एका स्पॅनिश कंपनीने तयार केले आहे.  


पाहा: INS Vagsheer: आयएनएस वागशीर नौदलाच्या ताफ्यात येणार



इतर महत्त्वाच्या बातम्या: