मुंबई: माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेचा अपघात झाला असून त्यामध्ये दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले आहे. पावणे दहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. गडग एक्सप्रेसच्या इंजिनने दादर-पद्दुचेरी एक्सप्रेस मागून धडक दिल्याने त्याचे मागचे तीन डबे हे रुळावरून घसरले आहेत.  सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण मध्य रेल्वेची वाहतूकसेवा विस्कळीत झाली आहे. 


दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले आहेत. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती आहे. पण यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्रीच्या वेळी मुंबईतून अनेक एक्सप्रेस सुटत असतात, त्यामुळे या अपघाताचा परिणाम दादर-पद्दुचेरी एक्सप्रेस ही दादर रेल्वे स्टेशनवरुन बाहेर जात होती. 


रेल्वेचे अधिकारी प्राथमिक माहिती घेत आहेत. रात्रभर काम करुन हे तिन्ही डबे रुळावर आणण्यात येणार असून त्यानंतर ही वाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांवर याचा परिणाम होणार असून लोकल सेवेवरही परिणाम होणार आहे. 


या अपघातामुळे फास्ट ट्रॅकवरील सर्व लोकल या स्लो ट्रॅकवर कन्व्हर्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्लो ट्रॅकवर मोठा भार आला असून सर्व वेळापत्रक कोलमडले आहे. 


सर्वात प्रथम यामध्ये कोणती हानी झाली आहे का ते पाहण्यात येत आहे. इतर प्रवाशांना उरलेल्या कोचमध्ये हलवण्यात येणार असून पुढच्या स्टेशनवर या गाडीला एक्स्ट्रा तीन डबे जोडण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :