Eastern Railway Vacancy 2022 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षी लाखो तरुण रेल्वेत नोकरी मिळविण्याच्या तयारीत रात्रंदिवस व्यस्त असतात आणि ते रिक्त पदाची आतुरतेनं वाट पाहत असतात. पूर्व रेल्वेनं अप्रेंटिसच्या पदांसाठी बंपर रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या नोकऱ्या अनेक विभागांत विभागल्या जातात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 2972 पदांची भरती केली जाणार आहे.


जर तुम्ही रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर आरआरसीच्या अधिकृत वेबसाइट rrcer.com वर जाऊन भरतीचा अर्ज भरू शकता. अर्ज 11 एप्रिल 2022 पासून स्विकारले जातील, तर अर्स करण्यासाठीची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. 


शैक्षणिक पात्रता  


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डाचं दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये आठवी पास असलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सर्व तपशील तपासावेत असं आवाहन भारतीय रेल्वेकडून करण्यात आलं आहे. 
 
निवड प्रक्रिया


भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदांवर उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर करण्यात येईल. पूर्व रेल्वे अंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींना निकषांनुसार मासिक वेतन दिलं जाईल. तुम्हीही रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI